शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

अतिक्रमणे हटवून अवैध धंद्यांना आळा

By admin | Updated: January 20, 2016 01:18 IST

भोर-मांढरदेवी मार्गावरील वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवून अवैध धंद्यांना आळा घालून यात्राकाळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी

भोर : भोर-मांढरदेवी मार्गावरील वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवून अवैध धंद्यांना आळा घालून यात्राकाळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेऊन भविकांना चांगली सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना उपविभागीय अधिकारी मौसमी बर्डे-चौगुले यांनी दिल्या. मांढरदेवी काळुबाईची यात्रा २३ ते २५ जानेवारीदरम्यान होणार आहे. या निमित्ताने बर्डे यांनी भोर तालुक्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. तहसीलदार वर्षा शिंगण, नायब तहसीलदार डॉ. धनंजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते, सहायक गटविकास अधिकारी साळवे, डॉ. राजेश मोरे, पो.नि. श्रीकांत खोत, पशुधनविकास अधिकारी डॉ. सचिन देशपांडे,आगार प्रमुख युवराज कदम, मुख्याधिकारी संजय केदार उपस्थित होते.बर्डे म्हणाल्या, मांढरदेवीच्या दर्शनासाठी भोरवरुन आंबाडखिंड घाटातून ७० टक्के भाविक जातात. त्यामुळे शहरासह मार्गावर वाहतुकीची कोंडी होते. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, भाविकांना चांगली सेवा मिळावी यासाठी भोर-मांढरदेवी मार्गावरील हॉटेल व इतरत्र असणारे अवैध धंदे बंद करुन धूम्रपान करणाऱ्यांवर कारवाई करावी. वाहतुकीत अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवून वाहतूक सुरळीत करावी. भोर एसटी आगाराकडून यात्राकाळात मांढरदेवीला जाणाऱ्या भाविकांसाठी १०० एसटी बसची यवस्था करण्यात आली आहे. या वेळी भोर पंचायत समिती, पोलीस, उपजिल्हा रुग्णालय, पंचायत समिती आरोग्य विभाग, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम आदींनी तयारीचा आढावा दिला.