शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
3
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
4
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
5
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
7
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
8
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
9
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
10
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
11
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
12
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
13
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
14
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
15
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
16
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
17
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
18
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
19
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
20
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती

‘वृत्ती’ आणि ‘निवृत्ती’च्या घोळात ढेपाळली खाकी

By admin | Updated: March 1, 2016 01:44 IST

पोलीस आयुक्त के. के. पाठक यांना लागलेले निवृत्तीचे वेध आणि सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांची ‘दीर्घ रजा’ यामुळे सध्या पोलीस दलाला एकप्रकारची मरगळ आली आहे.

पुणे : पोलीस आयुक्त के. के. पाठक यांना लागलेले निवृत्तीचे वेध आणि सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांची ‘दीर्घ रजा’ यामुळे सध्या पोलीस दलाला एकप्रकारची मरगळ आली आहे. त्यातच अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त असलेल्या तीन पदांचा अतिरिक्त ‘चार्ज’ सी. एच. वाकडेंकडे आहे. आयुक्त पाठक यांनी घेतलेल्या काही निर्णयांमुळे सह आयुक्त रामानंद नाराज होऊन रजेवर गेल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे. गेल्या चार दिवसांत महिला आणि तरुणींवरच्या बलात्काराच्या गंभीर घटना घडल्या आहेत. सोबतच गेल्या आठवड्यात कर्वे रस्त्यावरच्या दशभुजा मंडळाच्या अध्यक्षावर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात जखमी झालेल्या अध्यक्षाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रात्री- बेरात्री होणाऱ्या वाटमाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. तर अनेक वर्षांपासूनचे वाहनचोरी, दरोडे आणि खुनांचे अनेक गुन्हे अद्यापही प्रलंबित आहेत. पुणे शहर आयुक्तालयाची धुरा सध्या पोलीस आयुक्त के. के. पाठक आणि अतिरिक्त आयुक्त सी. एच. वाकडे सांभाळत आहेत. पोलीस आयुक्त मार्चअखेरीस निवृत्त होत असल्यामुळे त्यांना निवृत्तीचे वेध लागले आहेत. आयुक्तालयामध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्तपदाची दक्षिण विभाग, उत्तर विभाग, गुन्हे शाखा आणि प्रशासन अशी चार पदे आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी अतिरिक्त आयुक्त प्रकाश मुत्याळ आणि पी. एन. रासकर यांची बदली झाली. त्या वेळीही दक्षिण विभागाचे पद रिक्तच होते. सध्या या चारही पदांचा पदभार वाकडेंकडे आहे. त्यातच भर म्हणून की काय सह आयुक्त रामानंद सुटीवर गेल्यामुळे त्यांचाही पदभार वाकडे यांच्याकडेच देण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून पोलीस आयुक्त आणि सह आयुक्तांमधील वाद चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे. सह पोलीस आयुक्तांनी घेतलेली लांबलचक सुटी त्याचीच परिणती असल्याचेही आयुक्तालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पोलीस आयुक्तांनी घेतलेले काही निर्णय रामानंद यांना पटले नाहीत. किंबहुना त्यांचे मत विचारात घेतले गेले नाही अशीही चर्चा आयुक्तालयामध्ये आहे. आयुक्तांची बढतीवर बदली अपेक्षित असल्यामुळे रामानंद थेट नवीन आयुक्त आल्यावरच ‘हजर’ होणार अशीही अटकळ बांधण्यात येत आहे. पोलीस आयुक्तांची बदली होणार असल्यामुळे कामापेक्षा नवीन पोलीस आयुक्त कोण येणार, याचाच अधिकाऱ्यांमध्ये अधिक खल रंगत आहे.बदलीला थोडाच अवधी शिल्लक असल्यामुळे आयुक्त ‘शांत’ आहेत, तर खात्यामध्ये ‘नॉन करप्ट’ अशी ओळख आणि दरारा असलेले रामानंद मोठ्या सुटीवर आहेत. त्यामुळे सध्या तरी पुणे पोलीस दल सुस्तावल्याची प्रतिक्रिया पुणेकरांमधून उमटत आहे.