शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

By admin | Updated: November 30, 2015 01:57 IST

जिल्ह्यातील चार धरणांमधून सोलापूरमधील उजनी धरणात १० टीमएसी पाणी सोडण्याचा आदेश कायम ठेवत तत्काळ पाणी सोडण्याच्या सक्त सूचना जलसंपत्ती प्राधिकरणाने दिल्या आहेत

पुणे : जिल्ह्यातील चार धरणांमधून सोलापूरमधील उजनी धरणात १० टीमएसी पाणी सोडण्याचा आदेश कायम ठेवत तत्काळ पाणी सोडण्याच्या सक्त सूचना जलसंपत्ती प्राधिकरणाने दिल्या आहेत. त्यामुळे आता सोमवारी ३0 नोव्हेंबरला होणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.२६ आॅक्टोबर रोजी प्राधिकरणाने चासकमान, भामा आसखेड, मुळशी, आंद्रा या धरणांतून १0 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे येथील शेतकरी संतप्त झाले होते. धरणांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याबरोबरच, ‘रास्तो रोका’ आंदोलनेही झाली. प्राधिकरणाकडे पुनर्विचार याचिका दाखल झाल्या. यावर प्राधिकरणाने आपला आदेश कायम ठेवला. त्यानंतर काही लोकप्रतिनिधी उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने वरील निर्णयाला स्थगिती न देता, ३0 नोव्हेंबरला पुढील सुनावणी ठेवली आहे. दरम्यान, २६ नोव्हेंबर रोजी प्राधिकरणाने तत्काळ पाणी सोडण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, दोन दिवस शनिवार व रविवारच्या सुट्या असल्याने पाणी सोडले गेले नाही; तसेच न्यायालयाचा निर्णयही बाकी होता. आता उद्या न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागून आहेत. जर न्यायालयाने पाणी सोडण्याचा निर्णय कायम ठेवला, तर मात्र प्रशासनाला तत्काळ पाणी सोडावे लागणार आहे. याचा सर्वाधिक फटका चासकमानच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना बसणार आहे.(प्रतिनिधी)मुळशी हे धरण टाटांच्या मालकीचे आहे. यातील मुळशीकरांसाठी ३४ दलघमी पाणी राखीव आहे. यात यंदा पाऊस कमी पडल्याने फक्त ३0 दलघमी पाणी मुळशीच्या वाट्याला आले आहे. यातील २६ दलघमी पाणी सोडले, तर फक्त ४ दलघमी पाणी मुळशीकरांना शिल्लक राहणार आहे. यात २0११च्या जनगणनेनुसार १ लाख ७३ हजार लोकसंख्या व त्यानंतर वाढलेली धरून ३ लाख लोकसंख्या आहे. ३५ हजार जनावरे आहेत. त्यांच्यासाठी चारापिके आहेत.ऊस वगळता, ३३ हेक्टरवर रब्बी पीक आहे. याच्यासाठी फक्त ४ दलघमी पाणी कसे पुरणार, असा सवाल मुळशी पंचायत समितीचे सभापती रवींद्र कंधारे यांनी केला. आमच्या तोंडचे काढून सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडले जाणार आहे. पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगांसाठी हा पाण्याचा क्रम आहे. मग, मुळशी धरणावरील वीजनिर्मिती हे उद्योगात येते. मग त्यातील पाणी सोडा. मुळशीकरांच्या तोंडचे पाणी का पळवताय, असा सवालही शेतकरी करीत आहेत.