शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष

By admin | Updated: May 12, 2016 01:37 IST

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जागेचा प्रश्न अनुत्तरीतच... मेट्रो केंद्रात रखडली.. विकास आराखड्यावर राज्य शासनाकडून केवळ बैठकाच सुरू..

पुणे : कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जागेचा प्रश्न अनुत्तरीतच... मेट्रो केंद्रात रखडली.. विकास आराखड्यावर राज्य शासनाकडून केवळ बैठकाच सुरू...बीडीपी आरक्षणाबाबतही निर्णय नाही..रिंग रोडचा प्रश्न ‘जैसे थे’ पीएमपी एफएसआय, यांसह पुणे शहराचे अनेक प्रश्न राज्य शासनाच्या दरबारी प्रलंबित आहेत. यावर मुख्यमंत्री शुक्रवारी काय निर्णय घेतात, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.शहराच्या राज्य शासनाकडे प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या १३ मे रोजी सर्वपक्षीय खासदार, आमदार, महापालिकेतील पदाधिकारी व पक्षनेत्यांची बैठक घेणार आहेत. शासनदरबारी विविध कारणांनी रखडलेल्या या प्रश्नांवर या बैठकीत मार्ग निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उरुळी देवाची व फुरसुंगी येथे कचरा टाकण्यासाठी आखून दिलेली डेडलाइन उलटून गेली, तरी तिथे कचरा टाकला जात आहे. महापालिकेला कचरा टाकण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध न झाल्याने शहराच्या कचऱ्याचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. पिंपरी सांडस येथील वनविभागाची जागा कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेला मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. हा विषय बैठकीत मांडला जाणार आहे. पुण्यानंतर नागपूर मेट्रोला मंजुरी मिळून त्याचे कामही मार्गी लागले; मात्र पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचा प्रस्ताव अद्याप केंद्र शासनाच्या दरबारी रखडलेला आहे. शासनाकडे मुद्रांकावरील एलबीटीचा अधिभार यासह इतर निधी थकीत आहे, त्याचे गाऱ्हाणे मांडले जाणार आहे. त्याचबरोबर नदीसंवर्धन, एचएसएमटीआर आदी प्रश्न बैठकीत मांडले जाणार आहेत. (प्रतिनिधी)