शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कळंबला टँकर पेटविण्याचा प्रयत्न, स्वाभिमानी संघटनेचे झेंडे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:47 IST

दुधाचा टँकर पेटवून देण्याचा प्रयत्न मंचर व नारायणगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला.

मंचर : दुधाचा टँकर पेटवून देण्याचा प्रयत्न मंचर व नारायणगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला. ही घटना कळंब (ता. आंबेगाव) च्या हद्दीत सहाणेमळा येथे दुपारी घडली. पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बुलडाणा अध्यक्षासह इतर तिघांना अटक केली आहे. तर एक जण फरार झाला आहे. ज्वालाग्राही पदार्थ, स्वाभिमानी संघटनेचे झेंडे व बॅनर तसेच अंबर दिवा व बोलेरो जीप पोलिसांनी जप्त केली. अटक केलेल्यातील दोघांनी यापूर्वी टँकर पेटविल्याचा प्रकार तपासात पुढे आले आहे.नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गरड पुणे- नाशिक महामार्गावर पेट्रोलिंग करत होते. वाहन वळवण्यासाठी ते सहाणेमळा येथे आले असता. टँकरला बोलेरो आडवी लावून एक जण टँकरवर चढल्याचा दिसला. मंचर येथून टँकर ( एन एल ०१ क्यू ०००१ ) हा मोरडे फूड येथे चॉकलेटचे लिक्विड खाली करून सुरतला निघाला होता. त्यावेळी सहाणेवस्तीजवळ पांढरी रंगाची बोलेरो (एमएच २७ एआर ३४११) ओव्हरटेक करून पुढे आली. टँकरला गाडी आडवी लावून बोलेरेतून पाच जण उतरले. शिव्या देत ही दुधाची गाडी आहे का? अशी विचारणा त्यांनी केली. त्यातील एकाने पाठीमागील कुलूप उघड असे सांगितले असता चालक बजरंग बहादूर अमरनाथ यादव याने त्यास विरोध केला. त्यातील एक जण टँकरवर चढला. पोलीस अधिकारी गोरड यांनी तातडीने तेथे येऊन टँकर पेटवून देण्याचा प्रयत्न हाणून पाडला. त्यावेळी नीलेश नरेंद्रराव कोहळे (रा. सुरुळी, ता. वरूड, जि. अमरावती) याला पकडण्यात आले. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांनी घटनास्थळी येऊन संदीप बाबुराव खडसे (रा.शेंदूर जना घाट), आकाश खुशालराव नागपुरे (रा. गव्हाणकुंड), कैलास वसंतराव फाटे (रा. खामगाव, सर्व ता. रा.खामगाव जि. बुलडाणा) यांना संयुक्त कारवाई करत पकडले. गजानन भंगाळे (रा. देऊळगाव राजा) हा फरार झाला आहे.दरम्यान बोलेरो जीपमधील टँकरला आग लावण्यासाठी आणलेले ज्वालाग्राही पदार्थ तसेच दोन माचीस पेट्या मिळून आल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे झेंडे, टोप्या, निळा अंबर दिवा पोलिसांनी जप्त केला आहे. टँकरचालक बजरंग बहादूर अमरनाथ यादव याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी नीलेश नरेंद्रराव कोहळे, संदीप बाबुराव खडसे, आकाश खुशालराव नागपुरे, कैलास वसंतराव फाटे, गजानन भंगाळे यांच्या विरोधात गर्दी जमवून दमदाटी, शिवीगाळ करून टँकर पेटवण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.त्यातील दोघांनी दुधाचा टँकर पेटवून दिल्याने देनडा पोलीस स्टेशन (ता. वरुड) येथे गुन्हा दाखल झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. प्रदीप जाधव व अजय गरड यांनी ही कारवाई केली आहे.कैलास वसंतराव फाटे हे स्वाभिमानी संघटनेचा बुलडाणा जिल्हाध्यक्ष तर इतर कार्यकर्ते असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यातील दोघांनी दुधाचा टँकर पेटवून दिल्याने देनडा पोलीस स्टेशन (ता. वरुड) येथे गुन्हा दाखल झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. आंदोलनाला विदर्भात प्रतिसाद मिळत नसल्याने पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन भडकाविण्यासाठी असे अनेक कार्यकर्ते जिल्ह्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.