शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत गाळे बांधण्याचा प्रयत्न फसला

By admin | Updated: April 22, 2015 05:33 IST

यवत येथे पुणे-सोलापूर महामार्गालगत ग्रामपंचायतीच्या जागेत गावपुढाऱ्यांचा अनधिकृत व्यापारी गाळे बांधण्याचा प्रयत्न प्रशासनाने हाणून पाडला.

यवत : यवत येथे पुणे-सोलापूर महामार्गालगत ग्रामपंचायतीच्या जागेत गावपुढाऱ्यांचा अनधिकृत व्यापारी गाळे बांधण्याचा प्रयत्न प्रशासनाने हाणून पाडला. दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष हराळे यांनी आज (दि. २१) प्रत्यक्ष बांधकाम सुरू केलेल्या जागेची पाहणी करून सदर काम तातडीने बंद करण्याचे आदेश दिले.यवत येथे धान्य बाजाराच्या बाजूला पुणे-सोलापूर महामार्गालगत कसलीही परवानगी नसताना व्यापारी गाळे बांधून काही विशिष्ट लोकांना गाळे देण्याचा घाट काही गाव पुढारी मंडळींनी घातला होता. ग्रामपंचायतीच्या मालकीचे गाळे महामार्ग चौपदरीकरणात गेले असल्याने सदर गाळेधारकांना नव्याने गाळे बांधून मिळावेत, अशी त्यांची मागणी होती. मात्र सदर लोकांच्या आडून महामार्गात खासगी जागा गेलेल्यांना देखील गाळे देण्याचा घाट होता. याला गावातील विरोधी गटाचा तीव्र आक्षेप होता. काल (दि. २०) रोजी सदर जागेवर संध्याकाळच्या सुमारास काम सुरू करण्यात आले. रात्रीचे काम सुरू असल्याने विरोधी गटातील पुढारी व नेत्यांना शंका आली. त्यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सदर काम अनधिकृत असून तातडीने बंद करा, अशी तक्रार केली. यानंतर रात्री काम बंद करण्यात आले. मात्र आज सकाळी परत काम सुरू करण्यात आले.दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष हराळे यांच्यापर्यंत सदर तक्रार करण्यात आली होती. आज सकाळी त्यांनी काम सुरु असलेल्या ठिकाणी भेट दिली. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, उपनिरीक्षक सुशांत किनगे, ग्रामसेवक जाधव आदी उपस्थित होते. काम अनधिकृत असल्याचे लक्षात येताच गटविकास अधिकारी यांनी तातडीने काम थांबविण्याचे आदेश दिले. तसेच यवत पोलीस स्टेशनमध्ये बोलावून संबधित ठेकेदार व काम करणाऱ्या गाव पुढाऱ्यांना समज दिली. केलेले काम काढण्याचे लेखी आदेशदेखील देण्याच्या सूचना केल्या. सदर केलेले काम २४ तासांच्या आत न काढल्यास पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश देखील देण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक जाधव यांनी दिली. अतिक्रमण करून काही विशिष्ट लोकांचे हित जोपासण्यासाठी सदर अतिक्रमण करण्याचा खटाटोप करण्यात आला होता, असे मत संबंधित तक्रारदारांनी व्यक्त केले. (वार्ताहर)