शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांचा विकासात खीळ घालण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 01:24 IST

बारामती नगरपालिका वाढीव हद्दीतील २० टक्के करवाढीला आम्ही सहमत नाही. वाढीव हद्दीतील केलेली करवाढ नगरविकास खात्याच्या कर मूल्य निर्धारण समितीने सुचविली आहे.

बारामती : बारामती नगरपालिका वाढीव हद्दीतील २० टक्के करवाढीला आम्ही सहमत नाही. वाढीव हद्दीतील केलेली करवाढ नगरविकास खात्याच्या कर मूल्य निर्धारण समितीने सुचविली आहे. मात्र विरोधक बारामतीच्या विकासात जाणीवपूर्वक खीळ घालण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष जय पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.करवाढीसंदर्भात शुक्रवारी (दि. २९) झालेल्या सुनावणीवेळी अधिकारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. काही वेळ सुनावणी बंद झाली होती. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटाने पत्रकारांशी बोलताना विरोधकांच्या भूमिकेवर आक्षेप घेत भूमिका स्पष्ट केली. या वेळी नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांसह राष्टÑवादीचे गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेवक संजय संघवी आदी नगरसेवक उपस्थित होते.या वेळी नगराध्यक्षा तावरे म्हणाल्या, की राष्टÑवादीची भूमिका ही लोकाभिमुख निर्णय घेण्याची आहे. विरोधक केवळ अडवणूक करीत आहेत. वाढीव करआकारणीची सूचना आम्ही केलेली नाही. तो अधिकार सभागृहाला नाही. मात्र, विरोधक प्रत्येक ठिकाणी विरोध करतात. नगरपालिका प्रशासन चालविणे महत्त्वाचे आहे. विरोधकांच्या चुकीच्या भूमिकेमुळे कामकाज बाजूला राहते. निरर्थक कामांमध्ये वेळ जातो, असे नगराध्यक्षा तावरे म्हणाल्या.ज्येष्ठ नगरसेवक गुजर म्हणाले, की नगररचना विभागाची करमूल्य निर्धारण समितीने ती करवाढ सुचविलेली आहे. ही करवाढ आम्ही सुचविलेली नाही. आतापर्यंत नगरपालिका हद्दीतील ज्या करआकारण्या झाल्या, त्या शासनाच्या नियमानुसारचझाल्या आहेत. वाढीव करआकारणीबात आज नियमानुसार नगररचना विभागाचे अधिकारी सुनावणीसाठी आल्यानंतर त्यांना सहकार्य करण्याची भूमिका प्रत्येकाने घ्यायला हवी होती. दबावाचे राजकारण करून अशांतता निर्माण करण्याची विरोधकांची भूमिका अयोग्य आहे, हीच भूमिका राहिल्यास येणारा अर्थसंकल्प होऊ शकणार नाही, अशी भीती गुजर यांनी व्यक्त केली.>उपनगराध्यक्ष जय पाटील म्हणाले, की विरोधकांना करवाढीबाबत मुख्यमंत्र्यांकडे जाणे शक्य होते. मात्र ते गेले नाहीत. ज्याचा दोष आमचा नाही, त्याचे खापर आमच्यावर फोडणे कितपत योग्य आहे. वाढीव करवाढीतील त्रुटींबाबत सुनावणी होऊन मिळकतधारकांना दिलासा मिळतो. त्यासाठी सुनावणीवेळी सहकार्याची भूमिका घेण्याची गरज असते, मात्र जाणीवपूर्वक विरोधक अधिकाºयांची अडवणूक करीत असल्याचे पाटील म्हणाले.