शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

पसार झालेल्या गुन्हेगाराचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : घरफोडी, लुटमार असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या चोरट्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना गुंगारा देऊन पळून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : घरफोडी, लुटमार असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या चोरट्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेलेला चोरटा गाडी स्लिप झाल्याने पोलिसांच्या हाती लागला. आपल्याला पकडू नये, म्हणून त्याने ब्लेड आणि चाकूने स्वत:वर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

बबलूसिंग प्रभूसिंग टाक (वय ३०) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याचे नाव आहे. पोलीस नाईक अमित साळुंखे यांनी यासंदर्भात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टाकविरोधात घरफोडी, लूटमार असे गुन्हे दाखल आहेत. तो उरुळी देवाची परिसरात राहत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली होती. त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी घराजवळ सापळा लावला. पोलीस आल्याची कुणकुण लागल्याने टाक अंधारात पसार झाला. दुचाकीवरून पसार झालेल्या टाकला पकडण्यासाठी पोलिसांनी पाठलाग सुरू केला.

काही अंतरावर त्याची दुचाकी घसरली. टाकने त्याच्याकडील चाकू तसेच ब्लेडने स्वत:वर वार केले. जखमी अवस्थेतील टाकला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.