शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीतील ‘तो’ खून चोरीच्या प्रयत्नातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शेलपिंपळगाव : खुनाच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीची कोरोना काळात तात्पुरत्या जामिनावर सुटका करण्यात आली. तो आळंदी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शेलपिंपळगाव : खुनाच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीची कोरोना काळात तात्पुरत्या जामिनावर सुटका करण्यात आली. तो आळंदी घाटावर फिरत असताना २३ फेब्रुवारी रोजी रात्री त्याच्यासोबत जबरी चोरीचा प्रयत्न झाला. त्यावेळी झालेल्या भांडणात तिघांनी मिळून त्याचा खून केला. विशेष म्हणजे घटनास्थळी कोणताही पुरावा नसताना आळंदी पोलिसांनी मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा तपास लावून तीनपैकी दोन आरोपींना जेरबंद केले. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते आळंदी पोलीस पथकाचा विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ फेब्रुवारी रोजी इंद्रायणी नदीच्या घाटावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या व्यक्तीच्या डोक्‍यात जड वस्तूने मारले होते. तसेच चेहरा विद्रुप केला होता. त्यानुसार आळंदी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत खुनाचा गुन्हा दाखल केला. सुरुवातीला घटनेबाबत काहीही पुरावा आढळला नाही. मृताच्या मोबाइल फोनवरून त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. महादेव शाम खंदारे (वय ३०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मात्र, आरोपींबाबत सुरुवातीला कोणतीही माहिती मिळाली नाही.

यापार्श्वभूमीवर आळंदी पोलिसांनी दोन पथके तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू केला. त्यात संशयित आरोपी निष्पन्न करून संतोष ऊर्फ कांच्या केरबा कांबळे (वय १९, रा. काळेवाडी देहूफाटा), केतन प्रकाश शिंदे (वय १८, रा. आळंदी) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी त्यांच्या देविदास ऊर्फ देव्या बबन चौरे (रा. हडपसर) नावाच्या फरार असलेल्या साथीदारासोबत मिळून हा गुन्हा केल्याचे कबूल केले. ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त मंचक इप्पर, सहायक आयुक्त राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, उपनिरीक्षक सुरेखा सागर, बापू जोंधळे, पोलीस कर्मचारी राजाराम लोणकर, बाळासाहेब खेडकर, नितीन साळुंखे, बाजीराव सानप, गजानन आडे, कैलास गर्जे, त्रिमूर्ती भोंडवे, दत्तात्रय टोके, संदीप रसाळ, रामदास मुकणे, मच्छिंद्र शेंडे यांच्या पथकाने केली आहे.

फोटो ओळ : आळंदी पोलीस पथकाचा गौरव करताना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश.