शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘टाटां’च्या धरणातून पुण्याला पाणी मिळवण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:10 IST

पुणे : देशात आजमितीला अतिरिक्त वीज निर्मिती होत आहे़ त्यामुळे मुळशीतील टाटा समुहाच्या मालकीच्या धरणातून पुणे शहरासाठी पाच-सहा ...

पुणे : देशात आजमितीला अतिरिक्त वीज निर्मिती होत आहे़ त्यामुळे मुळशीतील टाटा समुहाच्या मालकीच्या धरणातून पुणे शहरासाठी पाच-सहा टीएमसी पाणी मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा महापालिकेच्या सभागृहात शुक्रवारी (दि. १) अजित पवार व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला़ त्यानंतर ते बोलत होते़ महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, सुनील टिंगरे, चेतन तुपे, मुक्ता टिळक तसेच स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आदी यावेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले,“भामा-आसखेड धरणाचे पाणी पुण्याला मिळणार असल्याने खडकवासला धरण साखळीतून होणारा पाणीपुरवठा कमी करून शेतीसाठीचे आवर्तन वाढवावे असे पाटबंधारे विभागाकडून सुचवण्यात आले. मात्र पुण्याची वाढती गरज लक्षात घेऊन पुण्याला पाणी कमी पडू देणार नाही. त्याचवेळी जिल्ह्यातील शेतीलाही पाणी मिळाले पाहिजे. या दृष्टीने टाटांच्या मुळशी धरणातील पाणी मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत. या संदर्भात नेमलेल्या समितीला मी लवकरात लवकर अहवाल देण्यास सांगितले आहे.”

“भामा-आसखेड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना महापालिकेने मोबदला दिला. त्यामुळे महापालिकेला राज्य शासनाला पाण्यासाठी द्यावे लागणारे २६० कोटी रूपये यापुढे द्यावे लागणार नाहीत याची खबरदारी मी घेईन. त्यासाठी मंंत्रीमंडळातल्या सहकाऱ्यांना समजावून सांगेन,” असे आश्वासन पवार यांनी दिले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतीसाठीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होणार आहे. त्यामुळे शहरांनी वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर झाला पाहिजे. त्यासाठी पाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प जलदगतीने पूर्ण व्हावेत. मैलापाणी शुध्दीकरण आणि कचरा व्यवस्थापनावर भर देणे आवश्यक आहे. “पुणे हे देशातील क्रमांक एकचे स्मार्ट शहर म्हणून आपण स्थापित करू शकतो़ त्यासाठी २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना, मेट्रो, इलेक्ट्रिक बस, एचसीएमटीआर आदी प्रकल्प महापालिकेने सर्वांना विश्वासात घेऊन साकारावेत,” असे ते म्हणाले.

भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प साकारण्यात महत्वाची भूमिका पार पाडणारे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, अधिक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता सुधेश कडू, पाणीपुरवठा अधिकारी विजय कुलकर्णी आणि माजी पाणीपुरवठा अधिकारी प्रवीण गेडाम यांचा यावेळी पवार व फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़