पुणे : एअर फोर्सच्या लोहगाव स्टेशनवरील प्रतिबंधित क्षेत्राचे मोबाईलवर चित्रीकरण करणाऱ्या दोघा जणांना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघेही मूळचे उत्तर प्रदेशातील असून, ही घटना सोमवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली होती. जुबुर आलम अब्दुल सैफ अन्सारी (वय २५, रा. गोकुळ गार्डन, विमाननगर), सईउद्दीन नसीरुद्दीन अन्सारी ऊर्फ सुक्का (वय ४१) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सहायक सुरक्षा अधिकारी बी. डी. पटनाईक यांनी फिर्याद दिली आहे. लोहगाव येथील एअर फोर्स स्टेशन प्रतिबंधित क्षेत्र आहे. या परिसरामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव कोणत्याही व्यक्तीस फोटो व शूटिंग करण्यास मनाई आहे. मोटारीमधून आलेले आरोपी या ठिकाणी मोबाईलद्वारे शूटिंग करीत असताना गस्तीदरम्यान पकडले गेले होते.
बेकायदा चित्रीकरण करणारे अटकेत
By admin | Updated: October 7, 2016 02:57 IST