शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुण वाढविण्यासाठी लाच घेणा-यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:30 IST

सावित्रीबाई फुले विद्यापीठातील प्राध्यापकामार्फत सिव्हिल इंजिनिअरच्या विद्यार्थ्याकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकाला

 ऑनलाइन लोकमत
 
पुणे, दि.20 -  सावित्रीबाई फुले विद्यापीठातील प्राध्यापकामार्फत सिव्हिल इंजिनिअरच्या विद्यार्थ्याकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकाला पकडण्यात आले. प्रत्यक्षात प्राध्यापकाऐवजी आपल्या मित्राच्या मदतीने फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 
विठ्ठल रमेश साळुंखे (वय २७, रा़ सुंदरनगर, कात्रज कोंढवा रोड, कात्रज) आणि त्यांचा मित्र अविनाश कांबळे अशी त्यांची नावे आहेत. तक्रार देणारा विद्यार्थी सिव्हिल इंजिनिअरींगच्या दुसºया वर्षाला असून तो अनुतिर्ण झालेल्या दोन विषयाचे गुण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकामार्फत वाढवून उत्तीर्ण करुन देतो, असे त्याला एकाने सांगितले़ एका विषयाला २० हजार रुपये असे ४० हजार रुपयांची मागणी केली. 
या विद्यार्थ्याने १८ जुलैला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली़ विठ्ठल सांळुखे याच्याकडे अधिका-यांनी पडताळणी केली़. या विद्यार्थ्याकडून तीन विषयाचे ६० हजार रुपयांपैकी अ‍ॅडव्हान्स म्हणून ३० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार हा विद्यार्थी बुधवारी विठ्ठल साळुंखे याच्या कात्रज येथील घरी गेला. तडजोडीअंती २० हजार रुपये स्वीकारण्यापूर्वी साळुंखे याने विद्यापीठातील प्राध्यापकाना फोन लावला व या विद्यार्थ्याशी बोलणे करुन दिले. त्याबरोबर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने विठ्ठल साळुंखे याला ताब्यात घेऊन चौकशी केली़. त्याने ज्याला प्राध्यापक म्हणून फोन लावून दिला तो त्याचाच मित्र अविनाश कांबळे असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठातील कोणी प्राध्यापक किंवा कर्मचारी सहभागी आहेत का याचा तपास सुरु आहे.