शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमाफियांचा पथकावर हल्ला

By admin | Updated: March 21, 2016 00:40 IST

पेडगाव (ता. दौंड) येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळूउपसा करणाऱ्या माफियांनी महसूल पथकाच्या अधिकारीवर्गाला दमदाटी करीत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला

कुरकुंभ : पेडगाव (ता. दौंड) येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळूउपसा करणाऱ्या माफियांनी महसूल पथकाच्या अधिकारीवर्गाला दमदाटी करीत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला.अवैध उपशाबाबत वारंवार कारवाई होऊनदेखील वाळूउपसा बंद होत नाही. त्यामुळे दौंडचे तहसीलदार उत्तम दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध तलाठी व कर्मचारी यांचे पथक तयार करून नदीपात्राच्या परिसरात शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास गस्त घालत असताना पेडगाव परिसरात नदीपात्रात ८ ते १० जेसीबीने वाळूउपसा होत असल्याचे लक्षात येताच जेसीबी व अन्य वाहने ताब्यात घेतली. मात्र, जेसीबीचालक पळून गेले. यामधील एक चालक सागर लांडगे यास ताब्यात घेतले. चालकाने दिलेल्या माहितीनुसार, जेसीबीचा मालक युवराज शिंदे हा आहे. मात्र, काही वेळांतच शिंदे व त्यांचे साथीदार निहाल पिरजादे, शाहनूर सय्यद, इरफान काझी, मन्सूर पिरजादे, इरफान पिरजादे, शकूर शेख, अन्सर शेख, अकबर आत्तार, पप्पू कोथिंबिरे, दीपक नवले, सर्व राहणार पेडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर यांनी येऊन शासकीय अधिकारीवर्गाला दमदाटी करून त्यांच्या ताब्यातील जेसीबी व इतर वाहने पळवून घेऊन गेले. त्यामुळे त्यांच्यावर दौंड येथील पोलिसांत शासकीय कामात अडथळा आणणे व दमदाटी करणे इ.कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.