शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पीडितेला अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 03:04 IST

अखिल भारतीय युवक कॉँग्रेसचे समन्वयक रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केलेल्या पीडित महिलेने आपल्यावर अ‍ॅसिड हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची लेखी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : अखिल भारतीय युवक कॉँग्रेसचे समन्वयक रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केलेल्या पीडित महिलेने आपल्यावर अ‍ॅसिड हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची लेखी तक्रार विश्रामबाग पोलिसांकडे केली आहे. यासंदर्भात परिमंडल एकचे उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांच्याकडेही तक्रार देण्यात आली आहे. ही घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास बावधन रस्त्यावरील उड्डाणपुलालगतच्या रस्त्यावर घडल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. टिळक यांच्याविरोधात केलेली तक्रार मागे घेतली नाही, तर तोंडावर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडित महिला आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल तुजारे सोमवारी सकाळी पीडित महिलेच्या घरामधून बाहेर पडले. मोटारीमधून जात असताना बावधन रस्त्यावर असलेल्या क्रिस्टल होंडा दुकानाजवळील एका पुलाखालून उजवीकडे वळण घेऊन ते रस्त्याने जात होते. पीडित महिला स्वत: मोटार चालवित होती. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा जणांनी त्यांना गाडी आडवी घातली. दोघांपैकी एकाने त्यांना हातामधील बाटली दाखवली. त्यामध्ये पिवळ्या रंगाचे द्रव्य होते. या दोघांनीही हेल्मेट घातलेले होते. मोटारीच्या खिडक्या वाजवून हिंदीमध्ये ‘तुम रोहित तिलक और उसके घरवालोंके खिलाफ की हुई कम्प्लेंट वापीस लेना, वरना बोतल में जो अ‍ॅसिड है इसे तेरे मुहपे फेंककर तेरा काम कर देंगे,’ अशी धमकी दिली. त्यानंतर हे दोघेही दुचाकीवर बसून पसार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. बलात्काराची तक्रार दाखल केल्यानंतर माझे फोटो व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल केले असून ओळख समाजासमोर आणली आहे, यासंदर्भात तक्रार केली आहे. सायबर गुन्हे शाखेला चॅटिंगचे स्क्रिनशॉट्स, कॉल रेकॉर्डिंग, व्हाईस रेकॉर्डिंग, धमकीचे व्हिडीओ सादर केल्याचेही या महिलेने सांगितले. विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये महिला अधिकारीच नसल्याने तपास महिला सहायक निरीक्षकाकडे देण्यात आला आहे. मात्र, स्टेटमेंट महिला अधिकाऱ्याने घेणे आवश्यकता असताना तिची फिर्याद पुरुष अधिकाऱ्याने घेतली. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्तांनी एक महिला म्हणून करावा अथवा अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिका-याकडे द्यावा, अशी मागणी अ‍ॅड. तौसिफ शेख यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.