शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सणसवाडीच्या उपसरपंचावर हल्ला

By admin | Updated: April 15, 2016 03:33 IST

सणसवाडी (ता. शिरूर) येथील औद्योगिक कारखान्यात काम मिळविण्याच्या वादातून उपसरपंच युवराज दरेकर यांच्यावर सणसवाडीतीलच युवकांनी हल्ला करून गाडीची तोडफोड

कोरेगाव भीमा : सणसवाडी (ता. शिरूर) येथील औद्योगिक कारखान्यात काम मिळविण्याच्या वादातून उपसरपंच युवराज दरेकर यांच्यावर सणसवाडीतीलच युवकांनी हल्ला करून गाडीची तोडफोड केली असून, यातील केतन हरगुडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणसवाडी येथील कारखान्यात काम मिळविण्यावरून उपसरपंच युवराज दरेकर व हल्ला करणाऱ्यांमध्ये काल वाद झाला होता. याच वादातून आज सकाळी युवराज दरेकर हे सकाळी गावात आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम उरकून सणसवाडी चौकामध्ये त्यांच्या आॅडी (एमएच १२-जेक्यू ७७८८) वाहनातून येत असताना चौकात वेगवेगळ्या मोटारसायकलवरून हातात हॉकी स्टिक व दांडकी घेऊन ओलल्या केतन रोहिदास हरगुडे व दप्ीाक साहेबराव दरेकर (दोघेही रा. सणसवाडी, ता. शिरूर) यांनी दरेकर यांच्या वाहनाला गाडी आडवी लावून दीपक दरेकर याने दगड घेऊन वाहनाच्या काचेवर मारले, तर केतन हरगुडे याने हातातील हॉकी स्टिकने गाडीवर व युवराज दरेकर यांच्यावर हल्ला करीत असताना दीपक दरेकर यानेही मारण्यास सुरुवात केली. या वेळी केतन व दीपक यांच्याबरोबर असलेल्या इतर तीन ते चार जणांनीही शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, अचानक घडलेल्या या प्रकारावरून शेजारीच असलेल्या ग्रामस्थांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. केतन हरगुडे याला पकडून ठेवल्याने या हल्ल्यातून युवराज दरेकर बचावले आहेत. शिक्रापूर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी सणसवाडी येथे जाऊन केतन हरगुडे याला ताब्यात घेतले असून, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे हे पुढील तपास करीत आहेत.