शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम कार्ड बदलून फसवणूक करणारा जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एटीएममधून पैसे काढून देण्यासाठी मदत करण्याचा बहाणा करुन एटीएम कार्डची आदलाबदल करुन खात्यातून पैसे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : एटीएममधून पैसे काढून देण्यासाठी मदत करण्याचा बहाणा करुन एटीएम कार्डची आदलाबदल करुन खात्यातून पैसे काढून फसवणूक करणाऱ्यास सायबर पोलिसांनी अटक केली.

अनुप शिवनारायण पाझरे (वय ३३, रा. ढमाळवाडी, फुरसुंगी, मूळ नागपूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून वेगवेगळ्या बँकांची २७ एटीएम कार्ड, १ मोबाईल, ५० हजार रुपये रोख, दोन अंगठ्या, एक चैन असा ऐवज जप्त केला आहे. पाझरे याच्याविरुद्ध तेलगंणा राज्यातील अदिलाबाद तसेच नागपूरमधील हिंगणघाट, सावनेर, उमरखेड, खापरखेडा, कामठी पोलीस ठाण्यात ७ गुन्हे दाखल आहे. त्यापैकी ६ गुन्ह्यात तो फरार होता. कोंढवा पोलीस ठाण्यातही अशा प्रकारे एटीएम कार्ड बदल करुन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे.

कारपेंटरचे काम करणार्या व्यक्तीला २० जानेवारी रोजी एटीएममधून पैसे काढून देण्यासाठी मदत करण्याचा बहाणा करुन त्याच्या एटीएम पीनची माहिती घेऊन त्याच्या कार्डचा वापर करुन ७५ हजार ७६० रुपये काढून घेऊन फसवणूक केली होती. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई जाधव, अश्विन कुमकर, नवनाथ जाधव, अत्तार, गावडे यांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज याद्वारे आरोपीचा माग काढला. अनुप पाझरे याला फुरसुंगी येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक आयुक्त शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, उपनिरीक्षक अजुर्न बेंदगुडे व त्यांच्या ही कामगिरी पथकाने केली.