शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

सहायक अभियंता ‘एसीबी’च्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 03:30 IST

नवीन वीजजोड मंजूर करून देण्यासाठी लाच स्वीकारताना महावितरणच्या भोसरी येथील कार्यालयातील सहायक अभियंत्यासह अन्य एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरूवारी दुपारी दोनच्या सुमारास भोसरी येथील महावितरणच्या कार्यालयाजवळ करण्यात आली.

पिंपरी  - नवीन वीजजोड मंजूर करून देण्यासाठी लाच स्वीकारताना महावितरणच्या भोसरी येथील कार्यालयातील सहायक अभियंत्यासह अन्य एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरूवारी दुपारी दोनच्या सुमारास भोसरी येथील महावितरणच्या कार्यालयाजवळ करण्यात आली.महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या भोसरी शाखेतील सहायक अभियंता रोहित अशोक डामसे (वय ३१, रा. पिंपळे गुरव) आणि लाच स्वीकारण्यास पुढे आलेला आशिष जगन्नाथ देसाई (वय ३३, रा. भोसरी, पुणे) अशी लाचप्रकरणी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांनी एक्स सर्व्हिसमन कॉपोर्रेशन लिमिटेडमध्ये वर्कशॉपसाठी व्यापारी गाळा घेतला आहे. या गाळ्यासाठी ‘थ्री फेज’जोडणीसाठी त्यांनी अर्ज केला होता. नवीन विद्युतजोड मंजूर करून देण्यासाठी खासगी इसम देसाई याने सहायक अभियंता डामसे यांच्यासाठी ३५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने या विषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.भोसरी येथील महावितरणच्या कार्यालयाजवळ यातील पहिला हप्ता १० हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार तक्रारदार रक्कम देण्यास गेले. त्या वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून आशिष देसाई याला अभियंता डामसे आणि स्वत:साठी लाच घेताना रंगेहाथ पकडले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या