शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सहायक आयुक्तांच्या बदल्या

By admin | Updated: April 30, 2017 05:16 IST

पुणे शहरातील उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची सर्वच्या सर्व टीम बदलल्यावर आता सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचीही नवीन टीम पुण्यात आली आहे.

पुणे : पुणे शहरातील उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची सर्वच्या सर्व टीम बदलल्यावर आता सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचीही नवीन टीम पुण्यात आली आहे. शहर पोलीस आयुक्तालयातील व ग्रामीण पोलीस दलातील तसेच राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदली अन्यत्र करण्यात आली असून, अन्य जिल्ह्यांमधून किंवा विभागांमधून सहायक आयुक्त दर्जाचे २० अधिकारी या आस्थापनांवर नियुक्त झाले आहेत. ५ जणांची शहर व ग्रामीण दलातून अन्यत्र बदली झाली आहे.राज्यातील ९६ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, पुणे शहरात २० अधिकारी नियुक्त झाले आहेत. राज्य गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त आयुक्त दीपक हुंबरे यांची पुणे शहरात सहायक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. अ.ज.प.समितीचे प्रभाकर ढमाले यांचीही शहरात सहायक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. जळगावचे उपविभागीय अधिकारी समीर शेख, रत्नागिरीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री गायकवाड तसेच मुंबईतील अतिरिक्त अधीक्षक संजय निकम, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अधीक्षक नंदकिशोर भोसले यांची पुणे शहरात सहायक आयुक्तपदावर नियुक्ती झाली आहे. औरंगाबादच्या सिल्लोड उपविभागाचे अधिकारी बाजीराव मोहिते यांचीही शहरात सहायक आयुक्तपदी नियुक्ती झाली असून, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त अधीक्षक देविदास पाटील, तर अमरावतीहून मिलिंद पाटील यांचीही याच पदावर नियुक्ती झाली आहे. बीड येथील उपविभागीय अधिकारी गणेश गावडे यांची पुणे शहरात सहायक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.ठाणे शहराचे सहायक आयुक्त विकास तोटावार यांची महामार्ग सुरक्षा पथकाच्या उपअधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. लोहमार्ग उपअधीक्षक फत्तेसिंह पाटील यांची बोईसर येथे उपविभागीय अधिकारीपदी बदली झाली आहे. लातूर येथील उपविभागीय अधिकारी राजेश उणवणे यांची जिल्हा जातपडताळणी समितीच्या सदस्यपदावर नियुक्ती झाली आहे. मुंबईतील सहायक आयुक्त दादासाहेब शेळके यांची महामार्ग सुरक्षा पथकाच्या अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलाचे सहायक आयुक्त रामचंद्र ढगे यांची सांगली येथे उपअधीक्षकपदी बदली झाली आहे. - हवेलीच्या उपविभागीय अधिकारी वैशाली कडूकर यांची बदली राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपअधीक्षकपदी झाली आहे. सोलापूरच्या सहायक आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर, अमरावतीचे सहायक आयुक्त नरेंद्र गायकवाड यांचीही याच विभागात नियुक्ती झाली आहे. तर, फलटणचे उपविभागीय अधिकारी रमेश चोपडे व नाशिक येथील उपअधीक्षक कुंडलिक निगडे यांची याच विभागात उपअधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.- औरंगाबाद येथून बदली झालेले माणिक बाखरे यांची ग्रामीण उपअधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. मुंबई पोलीस दलातील सुहास गरुड यांची ग्रामीण पोलीस दलात हवेलीचे उपविभागीय अधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे. दौंडचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे यांची ठाणे ग्रामीण येथे बदली झाली आहे. पुणे शहर सहायक आयुक्त गणपत माडगूळकर यांची पुणे ग्रामीणच्या उपविभागीय अधिकारी पदावर बदली झाली.