शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

ओपन ग्रॅण्डमास्टर होण्याची ‘आकांक्षा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:52 IST

देशातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिस्पर्ध्यांना आपल्या आक्रमक खेळाने चेकमेट करणारी पुण्याची आकांक्षा हगवणे हिचे पुढील लक्ष्य ओपन ग्रॅण्डमास्टरचा किताब पटकाविण्याचे आहे.

पुणे : देशातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिस्पर्ध्यांना आपल्या आक्रमक खेळाने चेकमेट करणारी पुण्याची आकांक्षा हगवणे हिचे पुढील लक्ष्य ओपन ग्रॅण्डमास्टरचा किताब पटकाविण्याचे आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू असल्याची माहिती तिने दिली.आकांक्षा ही क्रीडाक्षेत्रात ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८’ पुरस्काराची मानकरी ठरली. त्यानंतर तिने ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. या वेळी तिचे वडील श्रीनाथ हगवणे उपस्थित होते.बुद्धिबळाच्या प्रवासाविषयी बोलताना आकांक्षा म्हणाली, ‘‘मी लहानपणी रोप मल्लखांब खेळायचे. मात्र, वयाच्या सातव्या वर्षी बुद्धिबळाचा क्लास लावला होता. मात्र, तो केवळ सायंकाळीच असायचा. त्यामुळे मग रोप मल्लखांबाऐवजी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. तेव्हापासून बुद्धिबळ हेच माझे क्षेत्र झाले आहे. आता मला ग्रॅण्डमास्टर व्हायचे असून, त्यासाठी तयारी सुरू आहे. बुद्धिबळातील एकाग्रतेचा फायदा मला अभ्यास करताना झाला. खेळामुळे वर्षभर शालेय अभ्यासक्रमाकडे पूर्ण दुर्लक्ष झाले होते. मात्र, परीक्षेच्या दोन महिने आधी अभ्यास करूनही दहावीला ८७ टक्के गुण मिळविता आले.>‘चौसष्ट घरांची राणी’‘चौसष्ट घरांची राणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्याआकांक्षा हगवणे हिने २०१५ मध्ये आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत१६ वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये २ सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावत ‘वुमन फिडे मास्टर’ हा किताब पटकावला होता.२०१५ आणि २०१६ अशी सलग २ वर्षे तिने राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत मुलींच्या गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली.आकांक्षाच्या नावावर १६ वर्षांखालील जागतिक स्पर्धेचे जेतेपदही आहे.याशिवाय तिने ‘वुमन इंटरनॅशनल मास्टर’ हा किताबदेखीलपटकावला आहे.