शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नर तालुक्यातील आश्रमशाळा दर्जाहीन

By admin | Updated: February 27, 2016 04:28 IST

जिल्हा दौैऱ्यावर आलेल्या अनुुसूचित जमाती कल्याण समितीने जुन्नर तालुक्यातील पाहणी आदिवासी आश्रमशाळा या दर्जाहीन असल्याबाबत नाराजी व्यक्त करून प्रकल्प

लेण्याद्री : जिल्हा दौैऱ्यावर आलेल्या अनुुसूचित जमाती कल्याण समितीने जुन्नर तालुक्यातील पाहणी आदिवासी आश्रमशाळा या दर्जाहीन असल्याबाबत नाराजी व्यक्त करून प्रकल्प अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आमदार रूपेश म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवसांपासून जिल्ह्यात ही समिती दौऱ्यावर आली आहे. त्यांनी बुधवारी आंबेगाव व मावळ आणि गुरुवारी जुन्नर व खेड या तालुक्यांत दौैरा केला.जुन्नर तालुक्यात आदिवासी आश्रमशाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, विविध विकासकामांची पाहणी केली; मात्र कौैतुकाचे चार शब्द बोलावेत, असे काम त्यांना दिसले नाही. दिवसभर अधिकारी-कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेण्याचीच वेळ त्यांच्यावर आली.प्रथम उंडेखडक येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली असता तेथे चौथी, पाचवी, सहावीच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गात शिकविले जात असल्याचे निदर्शनास आले. निमगिरी गाव धरणात गेलेले आहे. नवीन गावठाणात आदिवासी योजनांची काहीही अंमलबजावणी झाली नसल्याने समितीने ताशेर ओढले. देवळे येथील आरोग्य उपकेंद्राच्या दुरवस्थेमुळे अधिकऱ्यांना समितीच्या रोषाला अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागले.खडकुंबे येथील जिल्हा परिषद शाळा इमारत, आश्रमशाळेच्या कामाच्या दर्जा तसेच अंजनावळे येथील आश्रमशाळेच्या कामाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची ताकीद दिली. प्रकल्प अधिकारी आश्रमशाळेत जातात की नाही, असा सवाल केला. खडकुंबे येथील आरोग्य उपकेंद्र व पशुवैद्यकीय केंद्र बंद असल्याने खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत. समिातीत आमदार वैभव पिचड, काशिनाथ पावरा, पांडुरंग वरोरा, प्रभुदास बिलवेकर, चंद्रकांत सोनवणे आदी आमदारांचा समावेश होता. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांच्यासह विविध शासकीय अधिकारी सहभागी झाले होते. (वार्ताहर)खानापूर आश्रमशाळेचे अनुदान थांबवा खानापूर येथील इंग्रजी माध्यमाच्या निवासी आश्रमशाळेच्या व्यवस्थापनाचा पुरता बोजवारा उडाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रत्येक विद्यार्थ्यामागे मोठे अनुदान मिळत असूनही त्यांना चांगले भोजन मिळत नाही, पुस्तके नाहीत. व्यवस्थापन मंडळाचे दुर्लक्ष होत असल्याचे ताशेरे ओढले. प्रकल्प कार्यालय गांभीर्याने पाहत नसल्याने संबधितांच्या निलंबनाची कारवाईचा इशारा दिला. पाहणी अहवाल तयार करा. तोपर्यंत अनुदान थांबवा, अशी ताकीद प्रकल्प कार्यालयाला देण्यात आली. ही आश्रमशाळा शहरी भागात असूनही सुविधांच्या बाबतीत आदिवासी भागापेक्षा मागे राहिली आहे.