शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

वाद्य कारागीर पडद्यामागील कलाकार

By admin | Updated: December 28, 2015 01:47 IST

प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात वाद्याचे स्थान अनन्यसाधारण असते. गायकाच्या बाबतीत तंबोरा जर सुरात लागला नाही तर त्याचे गाणे फुलू शकत नाही.

पुणे : प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात वाद्याचे स्थान अनन्यसाधारण असते. गायकाच्या बाबतीत तंबोरा जर सुरात लागला नाही तर त्याचे गाणे फुलू शकत नाही. अशा वाद्यांची देखभाल करणाऱ्या वाद्य कारगीराचे स्थान संगीत क्षेत्रात महत्त्वाचे आहे. वाद्य कारागीर हे त्या मैफिलीतील पडद्यामागील कलाकर असतात, त्यांचा गौरव संगीताच्या व्यासपीठावर गौरव होणे महत्त्वपूर्ण आहे, असे मत ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. सुहास व्यास यांनी व्यक्त केले.गानवर्धन आणि नलिनी छगन सुरा ट्रस्ट यांच्या वतीने पहिला वाद्य कारागीर पुरस्कार वाद्यदुरुस्ती क्षेत्रात कार्यरत असलेल्या पुरुषोत्तम जोग यांना रविवारी प्रदान करण्यात आला. तसेच सरला कुलकर्णी स्मृती पुरस्कार भेंडीबाजार घराण्याच्या ज्येष्ठ गायिका अनुराधा कुबेर यांना देण्यात आला. टिळक स्मारक मंदिर येथे झालेल्या सोहळ्यात पं. व्यास यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते.डॉ. विवेक सुरा, गानवर्धनचे अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी उपस्थित होते. व्यास म्हणाले, वादक किंवा गायक कोणताही असो त्यांच्या दृष्टीने वाद्य संवेदनशील असते. ते योग्य स्वरात लागणे यावर मैफिलीची यशस्विता अवलंबून असते, त्यामुळे अशा वाद्य कारागिराला पुरस्कार देणे उचितच आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ दर्शविणारा स्वर-साज-नक्षत्र हा कार्यक्रम या प्रसंगी झाला. दयानंद घोटकर, रमा कुलकर्णी, रश्मी मोघे, अजय ढमढेरे, पूर्वा घोटकर यांनी गीते सादर केली. गायनाबरोबरच वाद्यवृंदाच्या सुरावटींवर सादर झालेल्या गीतांनी कार्यक्रमात एक वेगळीच रौनक आणली. ‘सुहाना सफर और ये मौसम हसी’, ‘मेरी सपनो की रानी कब आयेगी तू’ ही इतर लोकप्रिये गीते वाद्यावर सादर करण्यात आली.सूत्रसंचालन मंगेश वाघमारे यांनी केले. (प्रतिनिधी)