शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कला प्रवाही असायला हवी

By admin | Updated: June 3, 2017 02:56 IST

ज्याप्रमाणे आज शूरवीरांचे पोवाडे गायले जातात, त्याबरोबरच समाजबदलासाठी बलिदान देणाऱ्या दाभोलकर, पानसरे यांच्यावरील

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ज्याप्रमाणे आज शूरवीरांचे पोवाडे गायले जातात, त्याबरोबरच समाजबदलासाठी बलिदान देणाऱ्या दाभोलकर, पानसरे यांच्यावरील पोवाडेदेखील गायला हवेत. कला ही प्रवाही, नवीन गोष्टींना सामावून घेणारी असायला हवी. यासाठी विचारसन्मुख करणारे साहित्य वाचायला हवे. आपले पोवाडे, लावण्या हे आपले वैभव आहे. परंतु, त्यांना पुढे न्यायचे असेल तर नवीन गोष्टी अंगीकारत जुन्यांमध्ये देखील बदल करायला हवेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांनी व्यक्त केली.शाहीरसम्राट किसनराव हिंगे यांच्या अठराव्या स्मृतिदिनानिमित्त घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरद कुंटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. मनोहर जाधव, सरदार दाभाडे घराण्याच्या वंशज माँसाहेब वृषालीराजे दाभाडे, प्रबोधिनीचे अध्यक्ष हेमंत मावळे, प्रा. संगीता मावळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात शाहिरी निनाद -अमर शाहिरी या विशेषांकाचे प्रकाशन झाले. किसनराव हिंगे यांचे सहकारी ढोलकीवादक बंडा देशमुख यांचा विशेष गौरव करण्यात आला. शाहीर हेमंत मावळे आणि सहकारी यांनी या वेळी पोवाड्याचा कार्यक्रम सादर केला. पोवाडा वर्गातील बालशाहिरांनादेखील गौरविण्यात आले. अतुल पेठे म्हणाले, ‘कला सामाजिक प्रबोधनासाठी आहे. आज जगातील अस्थिरता बघता आपल्याला शांत होण्याची गरज आहे. यासाठी शांततेचे गुणगान गाणारा आणि अहिंसेचे तत्त्वज्ञान सांगणारा पोवाडा गायला हवा. जग बदलायचे असेल तर ते हिंसेने नाही तर सकारात्मक विचारांनी बदलायला हवे. हे बदल घडविण्यासाठी चांगले विचार समोर यायला हवेत’, असेही त्यांनी सांगितले. प्रा. डॉ. मनोहर जाधव म्हणाले, ‘आजच्या विद्यार्थ्यांमधील विचारक्षमता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रश्न पडतील, असे शिक्षण दिले पाहिजे. तरच, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होईल. पोवाडा वर्गातून विद्यार्थ्यांना आपल्या इतिहासाची माहिती दिली जाते. असे कलेचे वर्ग वाढायला हवेत.’ शाहिरा प्रा. रूपाली मावळे-देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. गणेश टोकेकर यांनी प्रास्ताविक केले. अरुणकुमार बाभुळगावकर यांनी आभार मानले. स्वातंत्र्यलढ्यातील वीरांचे शौर्य समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम हे शाहिरीच्या माध्यमातून झाले. या कलेतून इंग्रजांविरुद्ध लढण्याचे बळ दिले. परंतु, आज समाजातील वाईट प्रवृत्तींविरुद्ध लढण्याची गरज आहे. नवीन पिढीला देशभक्तीने प्रेरित करायचे असेल, तर शाहिरी काव्याशिवाय पर्याय नाही.- शरद कुंटे