शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
4
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
5
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
6
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
7
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
8
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
9
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
10
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
11
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
12
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
13
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
14
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
15
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
16
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
17
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
18
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
19
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
20
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!

उजनीत परदेशी पाहुण्यांचे आगमन

By admin | Updated: November 15, 2016 03:32 IST

रदेशातून स्थलांतरित करून हजारो किलोमीटरचा प्रवास करून उजनी जलाशय परिसरातील पाणलोट क्षेत्रात स्थलांतर करून रोहित (फ्लेमिंगो) पक्षी दाखल झाले आहेत.

कळस : परदेशातून स्थलांतरित करून हजारो किलोमीटरचा प्रवास करून उजनी जलाशय परिसरातील पाणलोट क्षेत्रात स्थलांतर करून रोहित (फ्लेमिंगो) पक्षी दाखल झाले आहेत. या वर्षी प्रथमच करोता (डार्टर) व शिरखंड्या दिसून आले आहेत.इंदापूर तालुक्यातील उजनी जलाशय रोहित (फ्लेमिंगो), पक्ष्यांचे वास्तव्याचे प्रमुख ठिकाण आहे. विस्तीर्ण जलाशय, खाद्यान्नाची मुबलकता, पाणथळ जागा अशा वास्तव्य उपयोगी गोष्टी असल्याने पक्षी आपल्या वसाहती थाटतात. मध्य आशिया तसेच आॅस्ट्रेलिया, आफ्रिका, केनियातील सरोवरांमध्ये त्यांना लागणाऱ्या अन्नाची कमतरता निर्माण झाल्यानंतर फ्लेमिंगो मोठ्या संख्येने स्थलांतर करतात. साधारणत: प्रति वर्षी डिसेंबर ते मार्च दरम्यान, प्लेमिंगो भारतात येऊन निरनिराळ्या ठिकाणी वास्तव्य करतात. महाराष्ट्रात जायकवाडी धरणाचे पाणलोट क्षेत्र, तसेच सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील मायणी अभयारण्यात दिसून येतात. उजनी फुगवट्यावर क्रौंच, रोहित, बदके, पानकोंबडी, चित्रबलाक, चांदवा, चमच्या, जांबळी, तलवार, राखी बगळा वेडर्ससह शेकडो विविध प्रकारच्या पक्ष्यांचे वास्तव्य आहे. अनेक स्थलांतरित पक्षी येथे मुक्कामी असल्याचे दिसून येते. विणीचा हंगाम असल्यामुळे पाणथळ व सुरक्षित ठिकाणी अनेक पक्षी पिलांना जन्म देतात. उजनी धरणावर येऊन पक्ष्यांना पाहणे हा एक वेगळाच अनुभव असतो. इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव, डिकसळ जुना पूल, पळसदेव या परिसरात हमखास फ्लेमिंगो पाहायला मिळतात.उजनी जलाशय परिसरात विशेषत: डिकसळ, कुंभारगाव या पट्ट्यातही प्लेमिंगो पक्ष्यांचे थवे दिसून येतात. जलाशयातील पाणी कमी झाल्यानंतर निर्माण होत असलेल्या दलदलीत त्यांचे विशिष्ट असे खास खाद्य निर्माण होत असते. यामध्ये शेवाळ, पानवनस्पती, किडे हे खाद्य खऱ्या अर्थाने ही एक प्रकारची मेजवानीच असते. रोहित पक्ष्याची चोच ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असते. चोचीच्या आकारामुळे या पक्ष्याला चिखलामधील खाणे शोधणे अतिशय सोपे जाते. तसेच, याच चोचीने ते चिखलाचे घरटेदेखील बनवतात. पाण्यामध्ये पांढऱ्या आणि गुलाबी छटा असलेल्या या पक्ष्यांचा थवा, लांबलचक गुलाबी पाय, पांढऱ्याशुभ्र पंखाच्या खाली भडक काळी-गुलाबी छटा, उंच मान आणि अणकुचीदार चोच यांमुळे हे पक्षी देखणे दिसतात. सूर्योदयापूर्वी या पक्ष्यांचे थवे तलावावर दाखल होतात आणि खाद्य शोधण्याची लगबग सुरू होते. एकमेकांना मानेने ढुशा देत, चिखलात चोच रुतवून ते खाद्य मिळवतात. या वेळी क्व्रा...,क्व्रा.. अशा आवाजाचा गलका करीत भक्ष्य पकडणाऱ्या प्लेमिंगोंचे दृश्य पाहण्याजोगे असते. ऊन पडल्यानंतर ते पाण्यातच आराम करतात. ते आपली उंच मान दुमडून पंखांच्या खाली खोचतात.. दिवसभर मौजमस्तीनंतर सूर्यास्तावेळी पुन्हा पक्षी हवेत झेपावतात. एकामागोमाग एक असा शिस्तबद्ध उडणाऱ्या या पक्ष्यांचा हा थवा थक्क करणारा असतो. देशातील अनेक पक्षितज्ज्ञांनी या परिसराला भेट देऊन पक्ष्यांची पाहणी केली आहे. उजनी फुगवट्यावर पर्यटनवाढीला चालना दिल्यास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. येथे १५० प्रजातींचे पक्षी येतात. पर्यटन विभागाच्या मान्यतेने कुंभारगाव येथे क्रांती प्लेमिंगो केंद्र सुरू केले आहे. पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध आहेत, असे पक्षीमित्र नितीन डोळे सांगितले.