शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी पाहुण्यांचे उजनी धरणक्षेत्रात आगमन

By admin | Updated: January 3, 2016 04:39 IST

थंडीची हुडहुडी वाढल्याने विदेशी पाहुण्यांची उजनी पाणलोट क्षेत्रात आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या भागात पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. पक्षिपे्रमींसाठी ही एक प्रकारे पर्वणीच आहे.

भिगवण : थंडीची हुडहुडी वाढल्याने विदेशी पाहुण्यांची उजनी पाणलोट क्षेत्रात आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या भागात पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. पक्षिपे्रमींसाठी ही एक प्रकारे पर्वणीच आहे. दरवर्षी थंडीमध्ये फ्लेमिंगो पक्षी इटली, आॅस्ट्रेलियातून भारतामध्ये गुजरात तसेच महाराष्ट्रातील मुंबई व पुणे जिल्ह्यामध्ये उजनी धरणाच्या भिगवण परिसरातील तक्रारवाडी, डिकसळ, कुंभारगाव या पाणलोट क्षेत्रात येतात. भिगवण शहर पुणे-सोलापूर महामार्गावर वसले असल्याने वाहतूक सोयीस्कर होते. त्यामुळे त्या शेजारील सर्व परिसर हा पर्यटकांसाठी पर्यटनाचा आकर्षण बिंदू होत असल्याचे दिसून येते. यामुळे या परिसरातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळत असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी देश-विदेशातील अनेक पर्यटक पक्षिनिरीक्षणासाठी तसेच वाईल्ड फोटोग्राफीसाठी येत असतात. तक्रारवाडी हे गाव एटीएमद्वारे स्वच्छ पाणी, तसेच वृक्षलागवड आणि निर्मल ग्राम पुरस्कारामुळे राज्यात नावाजले आहे. त्यामुळे राज्यातून अनेक नागरिक आणि पदाधिकारी या गावाला भेट देण्यासाठी आवर्जून येतात. यामुळे तक्रारवाडी हे गाव आता पर्यटन क्षेत्रातही आपले नाव रुजवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. येथील काही तरुणांनी भेट देणाऱ्या पर्यटकांना सुविधा पुरविण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. ...तर व्यवसायवाढ होण्यास मदतपर्यटकांना पक्ष्यांची माहिती देणे, जेवणाची व्यवस्था करणे आणि त्यांच्या निवाऱ्याची तात्पुरती व्यवस्था करण्याचे काम सुरू केले आहे. यातून तरुणांना रोजगार मिळत असून, त्यांची उपजीविका पार पडण्यास मदत होईल.