जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरी गडावर गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या पर्स चोरणाऱ्या ६ चोरट्या महिलांना जेजुरी देवसंस्थानाचे कर्मचारी व जेजुरी पोलिसांनी ताब्यात घेऊन या महिलांनी चोरलेला ऐवज जप्त केला. या महिलांना चोरी करताना रंगेहाथ पकडण्यासाठी देव संस्थानाच्या ठिकठिकाणी लावलेल्या सीसीटीव्हीची मोठी मदत झाल्याचे प्रमुख विश्वस्त संदीप घोणे यांनी सांगितले.या प्रकरणी मीरा रामदास चव्हाण (वय ३५, रा.मार्जी, ता. हवेली), रेणुका निवृत्ती भिसे (वय ४०, शिवदर्शन पर्वती, पुणे), सीता कैलास राखपसरे (वय ४२, रा. नीरा, ता. पुरंदर), पूनम जितेश सकट (वय २५, महादेवनगर, हडपसर), सुनीता अशोक पवार (वय ३०, शंकरमठ, रामटेकडी पुणे), संगीता कैलास राजगुरू (वय १८, रा. मुंढवा पुणे) या सहा महिलांना अटक करण्यात आली आहे. (वार्ताहर)
पाकीटमारी करणाऱ्या महिलांना अटक
By admin | Updated: January 11, 2017 03:26 IST