शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

मंडलाधिकाऱ्यास लाच घेताना अटक

By admin | Updated: February 10, 2016 03:20 IST

शेतजमीन खरेदीखताची सातबारावर नोंद करण्यासाठी मंडल अधिकारी हरिभाऊ रामचंद्र काटकर यांना मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने ४ हजारांची लाच घेताना पकडले.

मोरगाव : शेतजमीन खरेदीखताची सातबारावर नोंद करण्यासाठी मंडल अधिकारी हरिभाऊ रामचंद्र काटकर यांना मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने ४ हजारांची लाच घेताना पकडले. मोरगाव (ता . बारामती) येथे पोलीस मदत केंद्रासमोर हाकेच्या अंतरावर मंगळवारी (दि. ९) सायंकाळी सव्वाचार वाजता हा प्रकार घडला. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरगाव येथील मुख्य चौकात फिर्यादी एस. एल. खोमणे यांना मोरळवाडी (ता .बारामती) येथील खरेदी केलेल्या शेतजमिनीचा दस्त नोंद करून या मिळकतीचा सातबारा तयार करण्यासाठी मोरगावचे मंडलाधिकारी काटकर यांनी ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. परंतु यामध्ये तडजोड करून ४ हजार रुपये देण्यासाठी वारंवार त्यांनी तगादा लावल्याची तक्रार आहे.आज यातील रक्कम रुपये ४ हजार घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून काटकर यास पकडले. मोरगाव मुख्य चौकात पोलीस मदत केंद्रासमोर श्री मयूरेश्वर स्वीट्स दुकानात ही कारवाई करण्यात आली. या पथकाने अनपेक्षित छापा टाकल्याने बारामती महसूल खात्यात प्रचंड खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस अधीक्षक प्रकाश शिंदे, सहपोलीस निरीक्षक अरुण घोडके, जालिंदर तांदळे यांच्यासह पथकाने सापळा रचून कारवाई केली. (वार्ताहर)