शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

चॅटिंग अ‍ॅपद्वारे ओळख करून तरुणाला लुटणारे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:08 IST

इम्रान दस्तगीर सय्यद (वय २०, रा. कोंढवा खुर्द), मुफिज जलाल मुल्ला (वय २०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा), उमेर उमर खान ...

इम्रान दस्तगीर सय्यद (वय २०, रा. कोंढवा खुर्द), मुफिज जलाल मुल्ला (वय २०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा), उमेर उमर खान (रा. आलिफा टॉवर, कोंढवा) आणि फरदान ताबीश सय्यद (रा. शिरूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

यश बाबसाहेब सोनावणे या तरुणाला २९ मे रोजी मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल जबरदस्तीने चोरून नेण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार पृथ्वराज पांडुळे, मोहन मिसाळ यांना बातमी मिळाली की, सोनावणे यांना लुटणारे मिठानगर भागातील संडे बाजार मैदानात थांबवले आहेत. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे व त्यांच्या सहकार्‍यांनी तेथे जाऊन इम्रान सय्यद व मुफिज मुल्ला यांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांचा साथीदार उमेर खान हाही बरोबर असल्याचे समजले. पोलिसांनी त्यालाही पकडले. तिघांनाही अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची २ मेपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती. तपासादरम्यान चौकशीत फरदान सय्यद याने चॅटिंग अ‍ॅपद्वारे फिर्यादी याच्याशी संपर्क साधून त्याला बोलून घेतले. सर्वांनी मिळून मारहाण करून लुटल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी फरदीन सय्यद याला अटक केली आहे. त्यांच्याकडून आरोपींनी चोरलेले मोबाईल फोनसह १ लाख २० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

ही कामगिरी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे, अभिजित रत्नपारखी, मोहन मिसाळ यांच्या पथकाने केली.