शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:10 IST

पुणे : राष्ट्रपुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या एका वॉचमनला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. स्वरुप प्रल्हाद भोसले (वय ३५, रा. ...

पुणे : राष्ट्रपुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या एका वॉचमनला सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

स्वरुप प्रल्हाद भोसले (वय ३५, रा. भिलारेवाडी, मूळ गाव राजेगाव, ता. दौंड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी ८ मेपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

याप्रकरणी आकाश चंद्रकांत शिंदे (वय २४, रा. डावी भुसारी कॉलनी, कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून वेगवेगळ्या डिजिटल माध्यमावर कोणी आक्षेपार्ह काही पोस्ट टाकल्यास त्यांची दखल घेऊन त्याचा तपास विविध जिल्ह्यांतील पोलिसांकडे सोपविला जातो. पुणे शहर सायबर पोलिसांकडे अशा काही प्रकरणांचा तपास सोपविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हाके यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तींवर फेसबुक ग्रुप, इंटेलेक्चुअल फोरम नावाचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, कोमट बॉईज अँड गर्ल फेसबुक ग्र्रुप, सीएम देवेंद्र फडणवीस फॅन क्लब, फेसबुक ग्रुप, इन्स्टाग्राम व ट्वीटर या समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मेसेज टाकण्यात आले आहेत. समाजातील वर्गावर्गात शत्रुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह पोस्ट टाकून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच शरद पवार अशा प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्त्वांच्या लौकिकास बाधा आणण्याकरिता त्यांचे फोटो मॉर्फ करून तसेच घाणेरड्या व अश्लील अशा पोस्ट टाकून बदनामी केली. ब्राह्मण व ब्राह्मणेतर जातींमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकल्या.

वेगवेगळ्या आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे नाना पंडित, वैभव पाटील, महेश गहुडले, धनंजय जोशी, सोनाली राणे, जयसिंग मोहन, संदीप पाटील, शौर्यन श्रीकृष्ण चोरगे, अतुल अयाचित, राजेंद्र पवार, राज पाटील, मुकेश जाधव इतर समाजमाध्यम वापरकर्ते यांचा सायबर पोलीस शोध घेत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके अधिक तपास करीत आहेत. आरोपी भोसले यास ८ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.