शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शारीरिक संबंधांचे ‘शुटिंग’ मित्राला पाठवून बदनामी करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:09 IST

पुणे : अल्पवयीन असताना तरुणीबरोबर शारीरिक संबंध ठेवून त्याचे चित्रीकरण करून ते संबंधित तरुणीच्या वस्तीतील मुलांना पाठवून बदनामी करणाऱ्या ...

पुणे : अल्पवयीन असताना तरुणीबरोबर शारीरिक संबंध ठेवून त्याचे चित्रीकरण करून ते संबंधित तरुणीच्या वस्तीतील मुलांना पाठवून बदनामी करणाऱ्या तरुणाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. नीलेश सुभाष शेंडगे (वय २५, रा. लोहियानगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी एका १९ वर्षांच्या तरुणीने येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना ऑक्टोबर २०१८ ते ३० ऑगस्ट २०२१ दरम्यान घडली. येरवडा पोलिसांनी बलात्कार तसेच पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

ही तरुणी अल्पवयीन असताना नीलेश शेंडगेने तिच्याबरोबर प्रेमसंबंध प्रस्थापित केले. तिच्या इच्छेविरुद्ध मित्रांच्या खोलीवर व इतर ठिकाणी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध निर्माण केले. त्याचे चित्रीकरण केले. या संबंधातून ती गर्भवती राहिल्यावर त्याने बहिणीच्या मदतीने तिचा गर्भपात करविला. तिने लग्नाविषयी विचारल्यावर शेंडगेने तिच्याबरोबर लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने फिर्यादी राहात असलेल्या वस्तीतील मुलांना तिच्याशी ठेवलेल्या संबंधांचे चित्रीकरण पाठवून तिची बदनामी केली. येरवडा पोलिसांनी नीलेश शेंडगे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक डोंगरे अधिक तपास करीत आहेत.