पुणे : भोर तालुक्यातील धांगवडी येथील जमिनीच्या वादातून महिलेचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्यात माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना आज राजगड पोलिसांनी अटक केली़ धांगवडी येथे १८ जून रोजी ही घटना घडली होती़ याप्रकरणी परस्परविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते़ थोपटे आज सकाळी साडेसात वाजता राजगड पोलीस ठाण्यात हजर झाले़ पोलिसांनी त्यांना व राहुल शंकर खामकर यांना अटक केली़ त्यानंतर कागदपत्रांची पुर्तता करुन भोर न्यायालयात ११ वाजता हजर केले़ न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली असल्याची माहिती राजगड पोलिसांनी दिली़ माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्यासह राहुल खामकर, युवराज चोर, दत्तात्रय चव्हाण, गोपीचंद आवाळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता़ थोपटे यांच्या गाडीची काच फोडणे व रखवालदाराला मारहाण केल्याची तक्रार थोपटे यांच्या वाहनचालकाने केली आहे़ धांगवडी येथील शेतजमीन गट नं़ २३६/३ येथे शेतातील गवत काढण्याचे काम तक्रारदार महिला व त्यांच्या सोबत इतर महिला करीत असताना माजी मंत्री अनंतराव थोपटे हे मोटारीतून आले़ त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी धमकावून शिवीगाळ करुन काठीने मारहाण केली होती़
अनंतराव थोपटे यांना अटक
By admin | Updated: July 5, 2015 00:22 IST