शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या भांडणाच्या रागातून तिघांवर सशस्त्र हल्ला

By admin | Updated: March 29, 2017 23:41 IST

हॉटेलवर झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून ३ जणांनी तलवार, कोयता, सत्तूर या घातक शस्त्रांनी हल्ला केल्याने एक

बारामती : हॉटेलवर झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून ३ जणांनी तलवार, कोयता, सत्तूर या घातक शस्त्रांनी हल्ला केल्याने एक जण गंभीर जखमी झाला. इतर तिघांवर वार करून हल्लेखोर फरार झाले. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने गावाला छावणीचे स्वरूप आले. आरोपींवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट, ३०७ व आर्म अ‍ॅक्टचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. माळेगाव येथील यश गार्डन या हॉटेलात जेवणावरून प्रकाश हनुमंत अडागळे व विशाल सर्जेराव अडागळे यांची हॉटेल मालक प्रशांत मोरे यांच्यासोबत वाद झाला. आज सकाळी साडेअकराला गजबजलेल्या शिवाजी चौकात प्रशांत मोरे, विनोद (टॉमी) मोरे, सारंग शिंदे (सर्व रा. शिवनगर, माळेगाव) यांनी प्रकाश अडागळे हे मित्रासमवेत थांबले असता प्रशांत मोरे याने जातीवाचक बोलून ‘मी तुला भीत नाही,’ असे म्हणून तलवारीने डोक्यात, विनोद (टॉमी) मोरे याने सत्तूरने उजव्या दंडावर, तर सारंग शिंदे याने कोयत्याने गंभीर वार केले. तर, ही भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या राहुल अडागळे, कुणाल सकट व सुनील खिलारे यांना मारहाण करून हे तिन्ही आरोपी हत्यारे उंचावत गावातून फरार झाले. काही जणांनी प्रकाश अडागळे यांना जखमी अवस्थेत बारामती येथे खासगी दवाखान्यात उपचारांसाठी दाखल केले आहे. जखमीची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने गावकरी भयभीत झाले आहेत. घटनास्थळी तालुका पोलीस निरीक्षक एस. आर. गौड यांनी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. फरार आरोपींवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट, खुनाचा प्रयत्न करणे व आर्म अ‍ॅक्ट कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. माळेगाव पोलीस दूरक्षेत्रासाचे उपनिरीक्षक सी. बी. बेरड हे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)माळेगावला जादा पोलिसांची गरज....शांतताप्रिय माळेगाव गटा-तटातील भांडणामुळे बदनाम झाले आहे. या गावात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवून गुन्हेगारी मोडीत काढली जाईल, असे तालुका पोलीस निरीक्षक एस. आर. गौड यांनी सांगितले. मात्र, दोन-तीन महिन्यांपासून सातत्याने माळेगावात दोन गटांमध्ये मारामारीचे प्रसंग घडत आहेत. त्यामध्ये धारदार शस्त्रांचा काठ्या, लोखंडी गज आदींचा वापर केला जातो. त्यामुळे झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या माळेगावमध्ये स्वतंत्र पोलीस ठाण्यासह अतिरिक्त पोलीस बळ देण्याची गरज निर्माण झाली आहे. या परिसरात शैक्षणिक संकुलामुळे बाहेरगावचे विद्यार्थीदेखील मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे या गावची कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.