शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीकडून मनमानी वसुली

By admin | Updated: November 25, 2015 01:11 IST

पीएमपीएमएल कडून विमानतळासाठी सुरू करण्यात आलेल्या वातनातुकूतील बसेससाठी राज्यशासनाचे नियम धाब्यावर बसवून मनमानी पध्दतीने तिकीट वसूली सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे

पुणे : पीएमपीएमएल कडून विमानतळासाठी सुरू करण्यात आलेल्या वातनातुकूतील बसेससाठी राज्यशासनाचे नियम धाब्यावर बसवून मनमानी पध्दतीने तिकीट वसूली सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, या बससेवेसाठी निविदा मागवून खासगी कंपनीच्या माध्यमातून ही सेवा पुरविली जात असल्याचे कारण पुढे करीत पीएमपी प्रशासनाने या प्रकारणातून हात झटकले आहेत. दरम्यान, या प्रकाराबाबत शहरातील स्वयंसेवी संस्थांनी याबाबतची तक्रार पीएमपी प्रशासनाकडे केली असून ही अन्यायकारक दरवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे. पीएमपीकडून या मार्गावर सध्या १० बसेस धावत आहेत. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.राज्यशासनाने २० डिसेंबर २००५ मध्ये काढलेल्या एका आदेशानुसार, सार्वजनिक वाहतूकीसाठी जास्तीत जास्त किती तिकीटदर आकारता येईल, याचे निकष घालून दिले आहेत. त्यानुसार, २२ किलोमीटरसाठी ३० रुपये तर ३२ किलोमीटरसाठी ४२ रुपये दर निश्चित केलेला आहे. तर ही सुविधा वातानुकूलीत केल्यास त्यासाठी तिकिटावर १५० टक्के सरचार्ज आकारण्याची मुभा देण्यात आलेली आहे. या नियमानुसार, पीएमपीएमएल कोथरूड ते विमानतळासाठी ७५ रूपये आणि विमानतळ ते हिंजवडी या मार्गासाठी १०५ रुपये दर आकारू शकते. पण प्रत्यक्षात कोथरूडसाठी १२० तर हिंजवडीसाठी १८० रुपयांचे तिकीट आकारले जात आहे. त्यामुळे ही तिकीट वसूली अन्यायकारक असून त्याबाबत पीएमपीने खुलासा करण्याची मागणी केली असल्याचे परिसर संस्थेचे रणजीत गाडगीळ यांनी सांगितले. या बाबतची तक्रार पीएमपी प्रशासनाकडे दिली असून सोबत राज्यशासनाच्या आदेशाची प्रत जोडण्यात आली आहे. हा निर्णय राज्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांसाठी आहे. (प्रतिनिधी)