शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव अंदाजपत्रकाला मंजुरी

By admin | Updated: December 22, 2015 01:39 IST

महापालिका शिक्षण मंडळाच्या मागील वर्षाच्या तुलनेत ५५ कोटी रुपयांनी वाढीव असलेल्या २०१६-१७ या वर्षाच्या ३४१ कोटी रुपयांच्या बजेटला सोमवारी स्थायी समितीने मंजुरी दिली

पुणे : महापालिका शिक्षण मंडळाच्या मागील वर्षाच्या तुलनेत ५५ कोटी रुपयांनी वाढीव असलेल्या २०१६-१७ या वर्षाच्या ३४१ कोटी रुपयांच्या बजेटला सोमवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. पुढील शैक्षणिक वर्षापासून निवडक १७ शाळांमध्ये मॉडेल स्कूल प्रोजेक्ट राबविण्यात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर आयुक्तांची गुणवत्तावाढ योजना, सर्व शाळांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविणे, ई-लर्निंग स्कूल अद्ययावत करणे, विज्ञान केंद्र यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.महापालिका शिक्षण मंडळाच्या वतीने शहरामध्ये ३०० शाळा चालविल्या जातात. शिक्षण मंडळाचे चालू वर्षासाठी २८५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे. आगामी २०१६-१७ या वर्षासाठी शिक्षण मंडळाने ३३४ कोटी ७७ लाख रुपयांचे बजेट सादर केले होते. त्यामध्ये आयुक्तांनी १७ कोटी रुपयांची काटछाट सुचविली होती. स्थायी समितीसमोर हे अंदाजपत्रक मांडण्यात आले असता मागील समितीने त्यामध्ये ५५ कोटी रुपयांनी मोठी वाढ करून ३४१ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी दिली असल्याची माहिती समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम यांनी दिली. या वेळी शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष वासंती काकडे उपस्थित होत्या. कदम यांनी सांगितले की, ‘यंदाच्या वर्षी १७ शाळा या मॉडेल स्कूल म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. या शाळांमधील वर्ग, शिक्षक कक्ष, सभागृह, माईक सिस्टिम या भौतिक सुविधांमध्ये सुधारणा केली जाणार आहे. शाळेच्या वेळेचे काटेकोरपणे नियोजन केले जाणार आहे. केवळ ५ तास हे अध्यापनासाठी असतील. उर्वरित वेळेमध्ये इतर उपक्रम राबविले जाणार आहेत. एका शाळेवर २० लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे.’रोजंदारीवर काम करणाऱ्या शिक्षकांच्या आकृतिबंधाला मंजुरी मिळण्याची शक्यता असून, त्यांच्या पगारासाठी २ कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकामध्ये करण्यात आली आहे. आठवीच्या वर्गासाठी १९ ठिकाणी प्रयोगशाळा उभारण्यासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. क्रीडानिकेतन शाळांच्या अल्पोपाहार व भोजन व्यवस्थेसाठी १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ई-लर्निंग स्कूल अद्ययावत करण्यासाठी ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. विद्यार्थी गणवेशासाठी ११ कोटी, रेनकोटसाठी २ कोटी व स्वेटरसाठी २ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.