शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१५५० बससाठी अखेर मंजुरी

By admin | Updated: August 11, 2016 03:28 IST

शहरातील बसची संख्या अपुरी पडत असल्याने पुणे महानगर परिवहन महमंडळासाठी (पीएमपी) १५५० बसची टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याच्या प्रस्तावास

पुणे : शहरातील बसची संख्या अपुरी पडत असल्याने पुणे महानगर परिवहन महमंडळासाठी (पीएमपी) १५५० बसची टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याच्या प्रस्तावास मुख्य सभेने बुधवारी अंतिम मंजुरी दिली. यातील १०० बस पालिकेच्या निधीतून खरेदी करण्यात येणार आहे, कर्ज उभारणीतून ९०० बसची खरेदी केली जाणार आहे उर्वरित ५५० बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. टप्प्याटप्प्याने बस खरेदीसाठी रक्कम उपलब्ध करून देण्याचे अधिकार प्रस्तावामध्ये आयुक्तांना देण्यात आले होते, नगरसेवकांनी उपसूचना मांडून ते अधिकार मुख्य सभेला असावेत, अशी दुरुस्ती केली. उपसूचनेसह प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.बसच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. त्यामुळे शहरातील बसची संख्या वाढविण्याची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर पीएमपीच्या संचालक मंडळाने १५५० बस खरेदीचा प्रस्ताव मंजूर करून पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांकडे पाठविला होता. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर आता त्या प्रस्तावाला मुख्य सभेनेही मंजुरी दिली.मुख्य सभेमध्ये बसखरेदीचा प्रस्ताव मांडल्यानंतर त्याची खरेदी कशाप्रकारे केली जाणार आहे याची माहिती सभासदांनी घेतली. या बसखरेदीसाठी ६० टक्के रक्कम पुणे महापालिकेला तर ४० टक्के रक्कम पिंपरी-चिंचवड पालिकेला उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. पालिकेच्या निधीतून १०० बसची खरेदी करण्यात येणार आहे, कर्ज उभारणीतून ९०० बस घेतल्या जाणार आहेत. ५५० बस भाडेतत्त्वावर घेणार आहेत. बस उपलब्ध झाल्यानंतर मूलभूत सुविधा देण्याचे दायित्वही महापालिकांवर असणार आहे.पीएमपी म्हटले की फारसे चांगले चित्र पुणेकरांसमोर उभे राहत नव्हते, मात्र गेल्या काही दिवसांतील उपाययोजनांमुळे पीएमपीच्या रूपात आमूलाग्र बदल होतो आहे. पीएमपीच्या सर्व बसला जीपीएस सिस्टीम बसविण्यात आली आहे. त्यामुळे सध्या बस कुटे आहे, ती कधी बसस्टॉपवर येणार आहे, याची माहिती पीएमपीच्या अधिकृत अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध होऊ लागली आहे. बस बंद पडण्याचे प्रकार कमी करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे.