शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सनदी लेखापालाची ‘एसपीव्ही’साठी नियुक्ती

By admin | Updated: May 27, 2017 01:17 IST

पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अभियान राबविण्यासाठी एसपीव्ही कंपनी स्थापन करण्यात येणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अभियान राबविण्यासाठी एसपीव्ही कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. कंपनीची रचना निश्चित करून तत्काळ कंपनी स्थापन करण्यासाठी सनदी लेखापालाची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी एक लाख रुपये सेवा करासह टेंडर टर्म्स, फायलिंग फीज, स्टॅम्प ड्युटी, डिजिटल सिग्नेचर अ‍ॅण्ड गर्व्हमेंट फीज यासाठी प्रत्यक्ष येणारा खर्च महापालिकेला करावा लागणार आहे. स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत पिंपरी - चिंचवड महापालिकेचाही समावेश झाला आहे. शहरात स्मार्ट सिटी अभियान राबविण्याकरिता विशेष उद्देश वहन (एसपीव्ही) कंपनी स्थापन करण्यात यावी, असे राज्याच्या नगरविकास विभागाने कळविले होते. तसेच एसपीव्हीची रचना निश्चित करून कंपनीची तत्काळ स्थापना करण्याचे आदेश दिले. पिंपरी- चिंचवड शहराचा तिसऱ्या टप्प्यात समावेश झालेला असल्याने नियोजनासाठी अल्प कालावधी आहे. त्यासाठी लेखापाल (सी. ए.) नेमणूक करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या. ए. एन. गावडे अ‍ॅण्ड को- चार्टर्ड अकाऊंटंस यांनी लघुत्तम दराची निविदा सादर केली. त्यामध्ये एक लाख रुपये सेवा करासह टेंडर टर्म्स, फायलिंग फीज, स्टॅम्प ड्युटी, डिजिटल सिग्नेचर अ‍ॅण्ड गर्व्हमेंट फीज यासाठी प्रत्यक्ष येणारा खर्च महापालिकेला करावा लागेल, असे नमूद केले आहे. सनदी लेखापालाच्या नियुक्तीनंतर स्मार्ट सिटीअंतर्गत एसपीव्ही स्थापनेच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. गावडे अ‍ॅण्ड को-चार्टर्ड अकाऊंटंस यांचे दर अर्थसंकल्पीय दरापेक्षा ३३.३३ टक्के कमी आहेत. त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, एसपीव्ही कंपनी स्थापन करण्याबाबत पुणे, ठाणे आणि सोलापूर महापालिकेत कामकाज केल्याचा अनुभव व कामकाज आदेशाचा समावेश आहे. त्यानुसार, ए. एन. गावडे अ‍ॅण्ड को-चार्टर्ड अकाऊंटस यांची एसपीव्ही कंपनी स्थापन करण्यासाठी सनदी लेखापाल म्हणून संधी मिळणार आहे.