शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
2
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
3
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
4
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
5
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
6
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
7
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
8
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
9
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
10
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
11
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
12
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
13
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
14
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
15
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
16
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
17
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
18
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
19
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
20
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास

नाभिक समाजाच्या मागण्या मार्गी लावू

By admin | Updated: January 1, 2015 01:10 IST

नवीन वर्षात नाभिक समाजाच्या मागण्यांबाबत कार्यवाही करू, असे आश्वासन देत लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत समाजाची बैठक घेऊ, असे आश्वासन सामाजिक न्याय व आदिवासी विकासमंत्री दिलीप कांबळे यांनी दिले.

पुणे : नवीन वर्षात नाभिक समाजाच्या मागण्यांबाबत कार्यवाही करू, असे आश्वासन देत लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत समाजाची बैठक घेऊ, असे आश्वासन सामाजिक न्याय व आदिवासी विकासमंत्री दिलीप कांबळे यांनी दिले.नाभिक परिसर पुणे यांच्या वतीने सामेवारी कोथरूड येथे राज्यातील नाभिक समाजाचा वधू-वर मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याचे उद्घाटन कांबळे यांच्या हस्ते झाले. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वप्नील राऊत, संजय सूर्यवंशी, गजानन पंडित, राहुल पवार, सुरेश जगताप, राजेश गायकवाड, सुमनताई पवार, बाळासाहेब तावरे, सुधीर गवळी, विलास वाघ, दिनकर चौधरी आदी उपस्थित होते. या वेळी समाजातील उत्कृष्ट कार्याबद्दल कांबळे यांच्या हस्ते अशोक शिंदे, गो. प. काशिद, शंकरराव श्रीमंगल, अशोक सरवसे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. समाजाच्या वतीने कांबळे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यात समाजाचा विशेष मागास प्रवर्गात समावेश करा, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टखाली संरक्षण, सलून व्यावसायिकांसाठी लोखंडी टपरी, मोफत आरोग्य सुविधा, पेन्शन योजना, सरकारी शॉपिंग सेंटरमध्ये राखीव गाळे आणि शूरवीर जीवा महाले यांचे स्मारक प्रतापगडावर बांधा आदी मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन यापूर्वीही समाजाच्या वतीने माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी दिले होते. दिलीप कांबळे यांनी या मागण्यांबाबत आपण २६ जानेवारी २0१५ पूर्वी कार्यवाही करू, असे सांगत लवकरच मागण्या पूर्ण करू, असे अश्वासन दिले. कांबळे यांनी या वेळी पुणे शहरात समाजाच्या सामाजिक उपक्रमासाठी १ एकर जागा पुढील सहा महिन्यांत देऊ, तसेच ग्रामीण भागातील सलून व्यावसायिकांना दहा बाय दहाची टपरी व्यवस्था करू, असेही अश्वासन दिले. नाभिक परिसर वधू-वर विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. (प्रतिनिधी)