शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आले पोलीस छावणीचे स्वरूप

By admin | Updated: February 22, 2017 03:08 IST

पुणे महापालिका निवडणुकीसाठी औंध-बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मध्ये ४६.६४ टक्के व बाणेर-बालेवाडी-पाषाण

औंध : पुणे महापालिका निवडणुकीसाठी औंध-बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मध्ये ४६.६४ टक्के व बाणेर-बालेवाडी-पाषाण प्रभाग ९ मध्ये ५५.९ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. बोगस मतदानाच्या संशयावरून बाणेरमध्ये राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, गाड्यांची तोडफोड, दगडफेक झाली. घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दुपारी घडलेल्या या घटनेमुळे बाणेर व बालेवाडीत तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. शहरातील १४५ संवेदनशील केंद्रांपैकी ५७ मतदान केंद्रे ही बाणेर-बालेवाडी प्रभागात असल्याने सर्वांचे लक्ष येथील मतदान प्रक्रियेकडे लागले होते. मात्र, मतदारांनी मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. भिकाबाई अनंतराव किरवे (वय १०१) यांनी आज (मंगळवार) आपला मतदानाचा हक्क बजावला. भिकाबाई किरवे या औंध येथील रहिवाशी आहे. पुणे महापालिका निवडणूक औंध-बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधून त्यांनी मतदान केले.किरवे यांनी वयाच्या १०१ व्या वर्षी देखील मतदानाचा हक्क बजावत युवकांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे. तसेच मतदान दिवस सुट्टी म्हणून साजरा करणाऱ्यांनाही एक चपराकच म्हणावी लागेल. भिकाबाई किरवे यांची मतदार म्हणून ही १६ वी निवडणूक आहे. नंतर मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने बाणेर, बालेवाडी, बोपोडी भागातील २५ ते ३० मतदान केंद्रावर गर्दी झाली होती. मतदान करण्याची वेळ सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत होती. मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. त्यामुळे काही मतदान केंद्रांवर रात्री ९ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. उंड्री : उंड्री - वडकी पंचायत समिती गण क्रमांक ८६ साठी ६२% टक्के मतदान झाले. या गणात एकूण २७, ६२२ मतदारापैकी सुमारे १७, ०९० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क यावेळी बजावला. या गणात चौरंगी लढत आहे. भाजपाचे मोहन कामठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन घुले, काँग्रेसचे संदीप बांदल, शिवसेनेचे संदीप मोडक यांच्यात चुरशीची चौरंगी लढत आहे.