शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

धराडेताई महापौर झाल्याचे अप्रूप

By admin | Updated: September 13, 2014 05:36 IST

अरे बापरे केवढा हा इमला! ...अन् इथं तिसरा मजला कुठं हाय, शकुंतलाताई कवा भेटणार, अशी उत्सुकता नवनिर्वाचित महापौर शकुंतला धराडे

पिंपरी : अरे बापरे केवढा हा इमला! ...अन् इथं तिसरा मजला कुठं हाय, शकुंतलाताई कवा भेटणार, अशी उत्सुकता नवनिर्वाचित महापौर शकुंतला धराडे यांच्या भेटीसाठी आतुर झालेल्या त्यांच्या सासर-माहेरकडील मंडळींना लागली होती. राज्यात विकासात आघाडीवर असलेल्या महापालिकेच्या महापौरपदावर विराजमान झालेल्या शकुंतलातार्इंबद्दल त्यांना कमालीचे अप्रूप असल्याचे त्यांच्या वागण्या-बोलण्यातून जाणवले. पालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर नेहमी स्टार्च कपड्यातील कार्यकर्त्यांचा वावर दिसून येतो. गुरुवारी मात्र साध्या कपड्यांतील खेडूत महिला, पुरुषांची गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसून आली. धराडेताई महापौरपदाची सूत्रे स्वीकारणार असल्याने त्यांना सदिच्छा देण्यासाठी त्यांचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील कोतुळ भांगेवाडी येथून ग्रामस्थ आले होते. अकोले तालुक्यातील अंभोळ या माहेरगावचे ग्रामस्थ, नातेवाईकही स्वतंत्र वाहने करून महापालिकेत आवर्जून हजर होते. महापौरपद, महापालिकेचा कारभार हाकण्याची जबाबदारी आपल्यातील एका महिलेला मिळाली, याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. गावाकडे ग्रामपंचायत सदस्य, फार तर सरपंच या पदापर्यंतच्या व्यक्तीला काय मान असतो, याची कल्पना असलेल्या या लोकांना महापौरपदाबद्दल फारशी माहिती नव्हती. ते कुतूहलाने महापालिका प्रशासकीय इमारत, महापौर कक्षाची पाहणी करीत होते. येणाऱ्या-जाणाऱ्याकडे विचारपूस करत होते. शहराशी फारसा संबंध नसलेले हे ग्रामस्थ काहीसे गोंधळलेले दिसत होते. महापौर निवडीनंतर सभागृहात भाषण सुरू होते, तर गावाहून आलेले नातेवाईक तार्इंना भेटण्यासाठी महापौर कक्षाबाहेर थांबले होते. बेस्ट सिटी असा लौकिक मिळविलेल्या शहराचा प्रथम नागरिक होण्याचा बहुमान मिळविलेली महिला आपल्यातीलच एक असल्याचे अप्रूप धराडे यांच्या माहेर आणि सासरच्या नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसत होते. नवनिर्वाचित महापौर म्हणून धराडे सभागृहातून बाहेर पडताच गावाहून आलेल्या मंडळींनी जल्लोषही ग्रामीण ढंगातच केला. लाल रंगाच्या गुलालाची उधळण करीत एकमेकांची गळाभेट घेतली. ‘‘आमची मेहुणी महापौर होणार म्हणून गावाहून आलोय. त्यांचा कौतुक सोहळा पाहायचा आहे. मोठं पद मिळालंय. आनंद झाला,’’ अशी प्रतिक्रिया राहुरीहून आलेल्या सखाराम उंडे यांनी दिली.(प्रतिनिधी)