शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यातील ‘सफरचंदवाली आजी’

By admin | Updated: July 8, 2016 04:02 IST

सफरचंदाची बाग म्हटलं की बर्फाळ प्रदेश डोळ्यांसमोर येतो. देशाचा सर्वांत उत्तर भाग म्हणजे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश या भागाची आठवण येते. पण खेड तालुक्यातील होलेवाडी

- संजय बोरकर,  आसखेड

सफरचंदाची बाग म्हटलं की बर्फाळ प्रदेश डोळ्यांसमोर येतो. देशाचा सर्वांत उत्तर भाग म्हणजे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश या भागाची आठवण येते. पण खेड तालुक्यातील होलेवाडी या छोट्याशा गावातील ६० वर्षीय आजीने घराभोवतालच्या परसबागेत चक्क सफरचंदाची बाग फुलवली. सफरचंदाची फळे हा गावातील कुतूहलाचा विषय ठरला आहे. फुलाबाई पानमंद या आजीची ओळख ‘सफरचंदवाली आजी’ अशीच झाली आहे. पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातील उद्योग, औद्योगिक वसाहत, विमानतळ यासह व्यापार, क्रांतिकारी व शेती व्यवसायाने नावाजलेला तालुका म्हणजे खेड तालुका होय. संत ज्ञानेश्वर, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक श्रीक्षेत्र भीमाशंकर व क्रांतिवीर राजगुरुनगरची भूमी म्हणजे खेड तालुका, अशी आगळीवेगळी ओळख राज्यात नव्हे तर देशात आहे. राजगुरुनगरपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील होलेवाडी गाव आहे. या गावातील दत्तनगरमधे राहणाऱ्या फुलाबाई पानमंद या आजीच्या घराच्या आवारातील परसबागेत असलेल्या सफरचंदाच्या झाडांना अंजिराएवढी सफरचंदे आलेली पाहायला मिळतात. दोन वर्षांपासून त्यांच्या बागेत सात झाडे आहेत. पानमंद कुटुंबीयांना प्रतीक्षा आहे, ती फक्त फळांची पूर्ण वाढ होऊन पिकण्याची व त्याची गोडी चाखण्याची. कारण सफरचंदाच्या गोडीवरच ठरणार पानमंद आजीच्या सफरचंदाच्या प्रयोगाचे यश, असे मत कृषितज्ज्ञांचे आहे. महाराष्ट्रातील शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती करण्यात गुरफटलेला आहे. तर काही ठिकाणी तरुण शेतकरी नैराश्यातून आत्महत्या करत असतानाच पानमंद आजीने सफरचंदाची परसबाग फुलवून एक आदर्श ठेवून शेतकऱ्यांच्या वेदनांवर फुंकर घातलेली दिसते, हे नाकारता येणार नाही.खेड तालुक्यातील माती व हवामान सफरचंदाच्या पिकाला पोषक आहे की नाही, याविषयी कृषी संशोधकांनी संशोधन करून अभ्यास केला पाहिजे, असे मत पश्चिम पट्ट्यातील प्रयोगशील बागायतदार महादू लिंभोरे यांनी व्यक्त केले.अशी बहरली सफरचंदाची बाग...दोन वर्षांपूर्वी आजींनी नातवंडांसाठी बाजारातून सफरचंद आणले होते. फळे खाल्यानंतर बिया घरासमोरील तुळशीच्या कुंडीत टाकल्या. बिया रुजल्यानंतर अंकुर फुटलेले कोंब घरासमोरील मोकळ्या जागेत लावले. सफरचंदाचे झाड यापूर्वी पाहिले नव्हते म्हणून कुतूहलाने रोपाची काळजी घेऊन रोप वाढविले आणि सात रोपांची बाग केली. सुमारे बारा रोपे तयार झाली होती; परंतु नातेवाइकांना वाटलेली रोपे त्यांनी गांभीर्याने न घेतल्याने वाया गेली. १० ते १५ फुटांपर्यंत उंचीची झाडे वाढली व १५-२० सफरचंदेही या वर्षी आली. या ठिकाणी आढळली सफरचंदाची झाडे..पुणे विद्यापीठाच्या बागेत थेरगाव येथे टेरेस गार्डनमध्ये, मावळ तालुक्यात या ठिकाणी एक-एक झाड होते. परंतु होलेवाडी येथे फुलाबाई पानमंद यांच्या परसबागेत तब्बल सात झाडांना फळे आल्याने हा विषय कुतूहलाचा ठरला आहे.सफरचंदास आपले येथील हवामान पोषक नाही त्यामुळे त्याचे उत्पादन व दर्जा सिमल्यासारखा असणार नाही. तितकी गोडीही सरपरचंदास असणार नाही. फक्त छंद म्हणून हे करण्यात हरकत नाही. व्यवसाय म्हणून करता येणार नाही.-लक्ष्मण होटकर, तालुका कृषी अधिकारी