शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

जातीवाद हेच आरएसएस-भाजपाचे मूळ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 05:13 IST

जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करून वर्चस्व निर्माण केले जात आहे. विकासाच्या नावाखाली जनतेला फसविले जात आहे. केवळ भांडवलशाहीच्या बाजूने सरकार आहे. जातीवाद हेच आरएसएस आणि भाजपाचे मूळ आहे.

पुणे : जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करून वर्चस्व निर्माण केले जात आहे. विकासाच्या नावाखाली जनतेला फसविले जात आहे. केवळ भांडवलशाहीच्या बाजूने सरकार आहे. जातीवाद हेच आरएसएस आणि भाजपाचे मूळ आहे. ही नवी पेशवाई असून, त्याविरोधात सर्वांनी संघटित होऊन लढा उभारण्याचे आवाहन एल्गार परिषदेत करण्यात आले.भीमा कोरेगाव येथील क्रांतीला २०० वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त भीमा कोरेगाव शौर्य प्रेरणा दिन अभियानांतर्गत रविवारी शनिवारवाडा येथे एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. रोहित वेमुलाच्या आई राधिका वेमुला यांच्या हस्ते चातुर्वर्णाची उतरंड फोडून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी, भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे राष्ट्रीय सचिव मौलाना अब्दुल हमीद अजहरी, जेएनयूमधील आंबेडकर विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालीद, उत्तर प्रदेशातील भीम आर्मीचे नेते विनय रतन सिंग, हैदराबाद विद्यापीठातील आंबेडकर विद्यार्थी संघटनेचा नेता प्रशांत दोंथा, छत्तीसगढमधील आदिवासी नेत्या सोनी सोरी, सर्वहारा जनआंदोलनाच्या उल्का महाजन आदी या वेळी उपस्थित होते. शेकडो संघटनांनी एकत्रित येत या परिषदेचे आयोजन केले होते. शनिवारवाड्याच्या प्रांगणात झालेल्या या परिषदेला मोठा प्रतिसाद मिळाला.उमर खालीद म्हणाला, ‘‘पंतप्रधान रामंदिरावर चर्चा करतील. पण जय शहा यांच्या ‘टेम्पल’ या कंपनीवर बोलणार नाहीत. हिंदूराष्ट्र ही कल्पना लोकशाहीविरोधी आहे. तसे झाले तर ते देशासाठी दुर्दैवी असेल. जे वैचारिकदृष्ट्या कमजोर आहेत, त्यांच्याकडून दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या केल्या जातात. भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये २०० वर्षांपूर्वी पेशवाई संपली. पण आजही मनुवाद व जातीवाद जिवंत आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर त्यांनाही यांनी देशद्रोही ठरवले असते. जातीवाद ही आरएसएसची ताकद असून, त्याला संपविण्याची गरज आहे. ’’संघ समाप्ती संमेलन घेऊयेत्या १४ एप्रिल रोजी मी अहमदाबादमध्ये नसेल तर नागपूरमध्ये येऊन संघ समाप्ती संमेलन घेऊ. लोकशाही संपवून संविधान बदलण्याची त्यांची इच्छा असल्याचे हेगडे यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते. त्यांचा हा डाव आधीपासूनच आहे. हिंमत असेल तर संविधान बदलून दाखवाच, २०१९ मध्ये मोदींना घरी बसवून संविधान वाचवू, असेही जिग्नेश मेवाणी यांनी सांगितले.कुठेही जा...नरेंद्र मोदी यांनी हिमालयात जावे, या जिग्नेश मेवाणी यांच्या वक्तव्यावर अनेकांनी टीका केली होती. त्याचा पुनरुच्चार मेवाणी यांनी केला. ते म्हणाले, त्यांच्या खोट्या आश्वासनांना जनता वैतागली आहे. केवळ जुमलेबाजी असते. त्यामुळे त्यांनी आता हिमालयात, नैनिताल कुठेही जावे. जागा त्यांनी निवडावी. तसेच निवडणुकीत त्यांनी ‘राम’ विरुद्ध ‘हज’ असे चित्र रंगविले होते. मोदींच्या डोक्यातील ही घाण संपविण्यासाठी त्यांच्या डोक्यात स्वच्छता अभियान राबवायला हवे, अशी खोचक टीका मेवाणी यांनी केली.राजकारण विसरूनएकत्र यादलित समाजातील अनेक जण विविध राजकीय पक्षांमध्ये आहेत. हे पक्षीय राजकारण सोडून सर्वांनी एकत्रित येत लढा उभारण्याची गरज आहे. भीमा कोरेगावच्या रणसंग्रामातून प्रेरणा घेऊन भाजपा आणि आरएसएस या नव्या पेशवाईविरोधात उभे राहायला हवे. स्मृती इराणीसह इतरांनी मिळून रोहितची हत्या केली. रोहितचे जे झाले ते इतर तरुणांबाबत घडू नये. यासाठी मी घराबाहेर पडून ही लढाई सुरू केली आहे. - राधिका वेमुला‘आरएसएस’ला २०२२ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. त्या काळात ते सत्ता मिळवून संविधान बदलण्याचा प्रचार करत आहेत. तुम्ही सरकारच्या विरोधात बोलले की देशद्रोही होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलणे अवघड झाले आहे. भीतीचे आणि दडपशाहीचे जे वातावरण देशात निर्माण झाले आहे, त्याच्या विरोधात लढावे लागेल.- अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर