शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणात कधीही कोणाशीही दोस्ती होऊ शकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:20 IST

रामदास आठवले : शिरूर पासपोर्ट केंद्राचे उद्घाटन

शिरूर : राजकारणात कधीही कोणाशीही दोस्ती करण्याची वेळ येईल हे सांगता येत नाही, असे येथे वक्तव्य करून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी भाजपाला सूचक इशारा दिला. राजकीय परिस्थितीवर आपल्या खास शैलीत चारोळ्या सादर करून धमाल उडवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शिरूर पासपोर्ट सेवा केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आठवले आज शिरूरला आले होते.

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अध्यक्षस्थानी होते. आमदार बाबूराव पाचर्णे, नगराध्यक्षा वैशाली वाखारे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे, भारतीय पासपोर्ट अधिकारी एसएफएच रिजवी, पोस्ट कार्यालयाचे विभागीय अधिकारी ताकवले, भाजपाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख अ‍ॅड. धर्मेंद्र खांडरे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल काशिद, तालुकाप्रमुख पोपट शेलार, शहरप्रमुख संजय देशमुख, महिला जिल्हा उपसंघटक विजया टेमगीरे, तालुका संघटक शैलजा दुर्गे, अनघा पाठक , रेश्मा शेख,पं.स.सदस्य डॉ बबन पोकळे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, शहराध्यक्ष निलेश जाधव, भाजपाचे शहराध्यक्ष केशव लोखंडे,नगरसेविका अंजली थोरात, पुजा जाधव, विनोद भालेराव,मंगेश खांडरे,माजी उपनगराध्यक्ष नेमीचंद फुलफगर किरण देशमुख, गणेश जामदार आदि यावेळी उपस्थित होते.

गेल्या आठवड्यात भाजपा शिवसेनेची युती झाली. त्यांनी लोकसभेच्या जागेसंदर्भातही कोण किती जागा लढणार याबाबतही घोषणा केली. घटक पक्षांबाबत मात्र युतीने भुमिका स्पष्ट न केल्याने अस्वस्थ असलेल्या आठवले यांनी आज येथे भाजपा शिवसेनेची तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.महाराष्टाच्या व देशाच्या भल्यासाठी भाजपा शिवसेना युती व्हावी.अशी भुमिका आपण सातत्याने मांडली. अखेर वाद मिटला. युती झाल्याचे आठवले म्हणाले. मात्र अचानक त्यांनी पवित्रा बदलत,कॉग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सोबत होतो, शरद पवार यांच्याशी आजही मैत्रीचे संबंध आहेत. राजकारणात मार्ग वेगळे असलेतरी दोस्ती तोडायची नसते.असे सांगतानाच कधी कोणाबरोबर दोस्ती करण्याची वेळ येईल, हे सांगता येत नाही.असे वक्तव्य करून दुर्लक्ष करणाऱ्या भाजपाला सुचक इशारा देण्याचा प्रयत्न केला.

इशारा दिला असला तरी आठवले यांनी नरेंद्र मोदी व सरकारचे भरभरून कौतुक केले. ह्यपासपोर्ट आॅफिस मुळे मला होत आहे हर्ष... कारण २०१९ हे आहे नरेंद्र मोदींचे वर्ष ह्य या चारोळ्यांनी त्यांनी भाषणाची सुरुवात केली. पंतप्रधान मोदी हे सर्वात अ‍ॅक्टीव्ह पंतप्रधान असल्याचे सांगतानाच जनतेच्या शंभर टक्के अपेक्षा पुर्ण झाल्या नसल्यातरी सरकारने मोठ्या प्रमाणावर कामे केल्याचे आठवले म्हणाले.एकंदरीतच युतीकडून आठवलेंच्या अपेक्षा पुर्ण न झाल्यास इशारा दिल्याप्रमाणे आठवले मित्र बदलतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले