आळंदी : मरकळ-आळंदी रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, हा रस्ता वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनत आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी आळंदीतील मरकळ रस्ता चौकात खड्डे चुकविण्याच्या नादात ट्रकची धडक बसून एकाला आपला प्राण गमवावा लागला होता. ती घटना ताजी असतानाच या रस्त्याने आणखी एक बळी घेतला आहे. गुरुवारी सायंकाळी मरकळ येथील आळंदीकडे येणाऱ्या रस्त्यावर एका भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिली. या अपघातात चालक डॉ. दिनकर प्रल्हाद बुरुकुल (वय ४३, रा. वाघोली, ता. हवेली, मूळ गाव बुलडाणा) यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने जागीच ठार झाले.
मरकळ रस्त्याने घेतला आणखी एक बळी
By admin | Updated: October 7, 2016 03:47 IST