शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

प्रवासी महिलांना जखमी करणारा दुसरा चोरटा जेरबंद

By admin | Updated: March 29, 2016 03:31 IST

हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेसमध्ये प्रवासी महिलांवर वार करून बॅग ओढून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांपैकी मंज्या काळे या चोरट्याला दौंड लोहमार्ग पोलिसांनी सापळा रचून

पिंपरी : हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेसमध्ये प्रवासी महिलांवर वार करून बॅग ओढून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांपैकी मंज्या काळे या चोरट्याला दौंड लोहमार्ग पोलिसांनी सापळा रचून भिगवण येथे अटक केली. समीक्षा तापस सिन्हा (वय २५) व त्यांची आई संपा तापस सिन्हा (वय ५४) यांच्यावर एक मार्च रोजी चोरट्यांनी हल्ला केला होता. यापूर्वी ६ मार्चला योगेश ऊर्फ शाकीर शाप्या भोसले या आरोपीस दौंडच्या लोहमार्ग पोलिसांनी अटक केली होती. मंज्या मात्र पसार झाला होता. पुण्यात कोथरूड येथे राहणाऱ्या समीक्षा व त्यांची आई संपा सिन्हा या दोघी एक मार्चला हावडा-पुणे एक्स्प्रेसने विलासपूर ते पुणे असा प्रवास करत होत्या. पहाटे साडेपाचच्या सुमारास दौंड रेल्वे स्थानकाजवळ गाडी थांबली. त्या वेळी अज्ञात इसमांनी खिडकीतून हात घालून त्यांची बॅग खेचण्याचा प्रयत्न केला. सिन्हा यांना जाग आली. त्यांनी प्रतिकार केला. त्या वेळी त्यांच्या हातावर वार करून चोरटे पळाले होते. गुन्ह्याचा तपास पुणे जिल्ह्याचे लोहमार्ग पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला.सहा मार्चला योगेश ऊर्फ शाकीर शाप्या भोसले (रा. वेताळनगर) यास अटक केली. २७ मार्चला दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक धनंजय वीर यांना याच गुन्ह्यातील दुसरा आरोपी मंज्या काळे (वय २३, रा. भगतवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) हा जखमी असून, त्यास उपचारासाठी भिगवण येथे आणणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)तीन पोलिसांवर कारवाईहल्ला झाला त्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या तीन लोहमार्ग पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामध्ये पोलीस नाईक बी. बी. लंकेश्वर, एस. आर. पाटोळे, ए. जी. काळे यांचा समावेश आहे. ज्या ठिकाणी त्यांची नेमणूक होती, तेथून ते पाच वाजताच निघून गेले होते. साडेपाच वाजता गुन्हा घडला, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली, असे पुणे जिल्हा लोहमार्ग पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.