शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदरमध्ये आणखी एकाचा निर्घृण खून

By admin | Updated: February 19, 2015 23:31 IST

साकुर्डे येथील शेतकऱ्याच्या खुनाची घटना ताजी असतानाच, आज नीरानजीक पिंपरे खुर्द गावाच्या थोपटेवाडी येथे सकाळी एका शेतकऱ्याचा डोक्यात हत्याराने वार करून खून केल्याची घटना घडली.

जेजुरी : साकुर्डे येथील शेतकऱ्याच्या खुनाची घटना ताजी असतानाच, आज नीरानजीक पिंपरे खुर्द गावाच्या थोपटेवाडी येथे सकाळी एका शेतकऱ्याचा डोक्यात हत्याराने वार करून खून केल्याची घटना घडली. पोपट लव्हबा थोपटे (वय ५७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मुलगा राहुल थोपटे यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आज सकाळी ६ च्या सुमारास मयत शेतकरी गावाबाहेर एक कि.मी. अंतरावरील माळरानावर मोकळ्या जागेत प्रातर्विधीसाठी गेला होता. या वेळी मागच्या बाजूने या शेतकऱ्याच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने अनेक वार केले. यात त्याची कवटी फुटून मेंदू बाहेर आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मारहाण होत असताना त्याने आरडाओरडा केला, तेव्हा गावातील काही इसमांनी मारहाण करणारी व्यक्ती पळून जाताना पाहिली. घटनेचे वृत्त कळताच जेजुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने परिसराची कसून तपासणी केली, मात्र गुन्हेगार सापडू शकला नाही. दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी मोरे, यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. घटनास्थळी श्वानपथक, ठसेतज्ज्ञ तसेच पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधिकारी आले होते. जेजुरी पोलिसांनी भा.दं.वि. ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील आरोपीबाबत धागेदोरे हाती आले असून, तपासासाठी चार पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच आरोपीला ताब्यात घेवू असे सहायक पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी सांगितले. (वार्ताहर)पोलिसांपुढे आव्हान४गेल्या ७ फेब्रुवारीला साकुर्डे येथेही अशाच प्रकारची घटना घडली होती. १५ दिवसांतील ही दुसरी घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. दोन्ही घटनांमुळे जेजुरी पोलिसांसमोर हे एक मोठे आव्हानच बनले आहे. ४साकुर्डे येथील घटनेबाबत अजूनही पोलिसांना कसलेच धागेदोरे मिळालेले नाहीत. मात्र, साकुर्डे येथील खुनाचा तपास अंतिम टप्प्यात आला असून, लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात असेल, असेही स.पो.नि. शेळके यांनी सांगितले.