पुणे : जिल्हा परिषदेचा जिल्हास्तरीय यशवंतराव चव्हाण कला व क्रीडा सांस्कृतिक महोत्सव नुकताच झाला. या महोत्सवात भजन, वक्तृत्व, लोकनृत्य या कला प्रकाराबरोबरच खो-खो, कबड्डी, लेझीम, लंगडीसह अन्य ११ क्रीडा स्पर्धा झाल्या. या सर्व स्पर्धांमधील विजेत्यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. स्पर्धाचे निकाल : वक्तृत्व स्पर्धा : मोठा गट विशाखा शितोळे, दौंड (प्रथम), ऋतुजा करेकर, मुळशी (द्वितीय), अस्मिता बरकडे, पुरंदर (तृतीय).छोटा गट : ईश्वरी जाधव, हवेली (प्रथम), अस्मिता तनपुरे, भोर (द्वितीय), श्रावणी चौधर, मावळ (तृतीय).गोळा फेक : मोठा गट- पल्लवी कावडे, खेड (प्रथम), वैष्णवी चव्हाण, हवेली (द्वितीय), ऐश्वर्या साळी, आंबेगाव (तृतीय), अनिल पवार, आंबेगाव (प्रथम), अमृत वायकर, बारामती (द्वितीय), दशरथ पवार, दौंड (तृतीय).चेंडूफेक : छोटा गट- आचल शिंदे, मावळ (प्रथम), कोमल तेली, जुन्नर (द्वितीय), दिनेश्वरी बुरवे, खेड (तृतीय), समीर केदार, जुन्नर (प्रथम), किशोर कडवे, मुळशी (द्वितीय), साहील आरोटे, जुन्नर (तृतीय).५० मीटर धावणे : छोटा गट ऋतुजा वाळके, हवेली (प्रथम), अनन्या नाणेकर, शिरूर (द्वितीय), श्रद्धा दातीर, मुळशी (तृतीय). मोठा गट महेश निंबाळकर, पुरंदर (प्रथम), आझिम शेख, शिरूर (द्वितीय), साहिल आरोटे, जुन्नर (तृतीय).१०० मीटर धावणे : मोठा गट जागृती घारे (प्रथम), स्वाती शेडगे (द्वितीय), ताई साळुंके (तृतीय). लहान गट- दत्ता कोळी (प्रथम), रामा वीर (द्वितीय), अमृत वाईकर (तृतीय).उंच उडी : मोठा गट- संजीवनी घोडे (प्रथम), तृप्ती वाव्हाळ (द्वितीय), सोनल घोगरे (तृतीय). लहान गट : दत्ता कोळी (प्रथम), अनंता ढेबे (द्वितीय), विठ्ठल गरदडे (तृतीय).लांब उडी : मोठा गट - अर्जुन गावडे (प्रथम), सूरजकुमार प्रजापती (द्वितीय), सद्दाम पठाण (तृतीय). मोठा गट- विद्या जाधव (प्रथम), अक्कलकर प्रतिभा (द्वितीय), पूजा जाधव (तृतीय). (प्रतिनिधी)
कला-क्रीडा स्पर्धांचे निकाल जाहीर
By admin | Updated: February 2, 2015 23:31 IST