शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूंच्या सुविधांसाठी घोषणा अन् वाहने थेट रनिंग ट्रॅकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:09 IST

पुणे : मंत्री, नेते येणार असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळ, मुख्य प्रवेशद्वारापासून ते कार्यक्रम ठिकाणापर्यंत तैनात असलेले पोलीस, कार्यकर्त्यांची लुडबुड ...

पुणे : मंत्री, नेते येणार असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळ, मुख्य प्रवेशद्वारापासून ते कार्यक्रम ठिकाणापर्यंत तैनात असलेले पोलीस, कार्यकर्त्यांची लुडबुड आणि नियम धुडकावून थेट रनिंग ट्रॅकवर नेलेली वाहने असे चित्र शनिवारी शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे पाहायला मिळाले.

क्रीडा विद्यापीठासाठी बालेवाडी क्रीडा संकुलाची पाहणी आणि आढावा बैठक शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार, राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. ट्रॅक खराब होईल म्हणून एरवी ट्रॅकच्या आजूबाजूलाही कोणाला फिरकू दिले जात नाही. ट्रॅकवरून चालू नका असे सांगण्यासाठीही सुरक्षारक्षक तैनात असतात. मात्र, शनिवारी मैदानाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकही ट्रॅकच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत होते. क्रीडा विद्यापीठाची घोषणा, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याचे ध्येय, खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाव्यात अशी भूमिका मांडली जात असताना राज्यकर्ते, नेते, प्रशासकीय अधिकारी याच भूमिकेला पाठ कशी दाखवतात? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिवछत्रपती क्रीडा संकुलातील अ‍ॅथलेटिक्स मैदानावर असलेला रनिंग ट्रॅक आधीच खराब झालेला आहे. त्यात या ट्रॅकवर शनिवारी वाहने चालवण्यात आली. क्रीडा विद्यापीठाच्या माध्यमातून भविष्यात अनेक खेळाडू घडवले जातील, अनेकांना संधी मिळेल, प्रशिक्षक प्रशिक्षण देतील, आंतरराष्ट्रीय पातळीवर पदकांचा टक्का वाढेल. मात्र, त्याचवेळी कठोर परिश्रम करून पुढे आलेल्या राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा खरंच मिळतील का? असा प्रश्न आजच्या प्रकारामुळे उपस्थित होत आहे.

मैदानाला दुरुस्तीची प्रतीक्षा

अ‍ॅथलेटिक्स मैदान १९९४मध्ये बांधून पूर्ण झाले. त्यानंतर २००७ -०८ मध्ये या मैदानाची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत याच मैदानावर स्पर्धा झाल्या. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात या मैदानावर कोणतीही स्पर्धा झालेली नाही. क्रीडा विद्यापीठ लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे लवकरच या रनिंग ट्रॅकचाही चेहरामोहरा बदलेल अशी अपेक्षा खेळाडूंना आहे.

कोट ---

क्रीडा विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर हे सर्व प्रकार बंद केले जातील. यापुढे कोणत्याही मैदानावर वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. सर्व मैदानांची योग्य ती काळजी घेतली जाईल. - सुनील केदार, क्रीडामंत्री

फोटो - रनिंग ट्रॅक