शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या पुरस्कारांची घोषणा

By admin | Updated: January 29, 2017 04:31 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे यावर्षीचे उत्कृष्ट प्राचार्य, संस्था, शिक्षक, महाविद्यालय व विभाग पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे यावर्षीचे उत्कृष्ट प्राचार्य, संस्था, शिक्षक, महाविद्यालय व विभाग पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार शहरी भागातून चंद्रकांत रावळ व डॉ. संजय सावंत यांना जाहीर झाला आहे. हे सर्व पुरस्कार पुढील महिन्यात विद्यापीठाच्या वर्धापनदिनी प्रदान केले जाणार आहेत. वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठाकडून दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाकडून यंदाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. उत्कृष्ट विद्यापीठ विभागासाठीचा पुरस्कार स्कूल आॅफ एनर्जी स्टडीज आणि विधी विभागाला जाहीर झाला आहे. उत्कृष्ट प्राचार्य म्हणून शहरी भागातून सिंहगड संस्थेच्या फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय सावंत, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत रावळ, ग्रामीण भागातून नाशिकमधील मातोश्री कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. गजानन खराटे व बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांना जाहीर झाला.उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार शहरी भागासाठी दिघीच्या आर्मी इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, पंचवटीच्या व्यंकटराव हिरे महाविद्यालय आणि पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांना, तर ग्रामीण विभागातून अहमदनगरच्या विखे पाटील फाउंडेशनचे इन्स्टिट्यूट आॅफ बिझनेस मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रूरल डेव्हलपमेंट आणि तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयास जाहीर झाला आहे. नावीन्यपूर्ण शैक्षणिक कामगिरी पुरस्कार विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे डॉ. दीपाली मालखेडे, विधी विभागाचे डॉ. तम्मा शास्त्री यांना, तर शहरी भागातून एमआयटी आॅफ फार्मसीचे डॉ. अल्पना कुलकर्णी, गणेशखिंडच्या मॉडर्न महाविद्यालयाचे डॉ. रवींद्र क्षीरसागर, ग्रामीण भागातून अवसरीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. दिलीप पानगव्हाणे आणि वाघोलीच्या जैन संघटनेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे डॉ. संजय गायकवाड यांना जाहीर झाला आहे. (प्रतिनिधी)मॉडर्न महाविद्यालयाला पुरस्कारउत्कृष्ट शिक्षक म्हणून शहरी विभागातून सीओईपीचे डॉ. मोहन खोंड, नाशिकच्या व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचे डॉ. रेशम भल्ला, ग्रामीण भागातून नाशिकच्या मातोश्री कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगचे डॉ. वर्षा पाटील आणि भारतीय जैन संघटनेच्या महाविद्यालयाचे डॉ. जोतीराम मोरे यांची निवड करण्यात आली आहे. फेलिसिटेशन आॅफ टिचर म्हणून वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ. दिगंबर मोकाट आणि गणेशखिंडच्या मॉडर्न महाविद्यालयाला पुरस्कार दिला जाणार आहे.