शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

अण्णासाहेब टापरे यांना सेवापदक

By admin | Updated: February 6, 2017 05:52 IST

सासवड (ता. पुरंदर) पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब साहेबराव टापरे यांना त्यांच्या दुर्गम भागातील नक्षलवादाविरुद्धच्या उल्लेखनीय

सासवड : सासवड (ता. पुरंदर) पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब साहेबराव टापरे यांना त्यांच्या दुर्गम भागातील नक्षलवादाविरुद्धच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून नुकतेच आंतरिक सुरक्षा सेवापदक मिळाले. पुण्यातील एका खास समारंभात जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या हस्ते त्यांनी पदक स्वीकारले. या वेळी जिल्ह्याचे अतिरिक्त अधीक्षक राजकुमार शिंदे, उपअधीक्षक (गृह) बरकत मुजावर हेही उपस्थित होते.देशांतर्गत अतिअडचणीच्या व जोखीम पत्करून दुर्गम भागात किमान दोन वर्षे कर्तव्य बजाविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यास त्याची तेथील उल्लेखनीय कामगिरी पाहून संबंधितास हे पदक गौरवार्थ दिले जाते. त्यातूनच टापरे यांची या पदकासाठी निवड झाली.टापरे २०११ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून भरती झाल्यानंतर छत्तीसगडच्या सीमेवर गडचिरोली जिल्ह्यात धानोरी तालुक्यात सावरगाव येथे अतिदुर्गम भागात अडीच वर्षे होते. तेथे नक्षलग्रस्त भागात त्यांनी जोखीम पत्करून उल्लेखनीय कामगिरी करून दाखविली. नक्षलवाद्यांशी तीन वेळा त्यांची चकमक झाली. त्यांनी विविध घटनांत तीन नक्षलवादीही हत्यारांसह पकडले. या कामगिरीतून त्यांना हे आंतरिक सुरक्षा सेवापदक मिळाले. गतवर्षीही त्यांना राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून विशेष सेवापदक मिळाले होते. यंदाचे पदक त्यांनी २६ जानेवारीच्या समारंभात स्वीकारले. सध्या ते गेली दीड वर्ष सासवडला नेमणुकीस आहेत. येथेही त्यांनी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून कामगिरी बजावत चांगला ठसा उमटविला आहे. गुन्हेविषयक तपासकामात त्यांची कामगिरी चांगली आहे. (वार्ताहर)