शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बाणेर पतसंस्थेला अण्णा हजारेंची भेट

By admin | Updated: January 14, 2017 03:38 IST

बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या बाणेर येथील मुख्य कार्यालयाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सदिच्छा भेट देऊन

पुणे : बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या बाणेर येथील मुख्य कार्यालयाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सदिच्छा भेट देऊन सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी अण्णा हजारे यांच्यासमवेत ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक अभिनंदन थोरात, समीर लडकत, शिवशक्ती व्यापारी मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत मुरकुटे, गणेश मुरकुटे हे मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी अण्णांनी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. दिलीप मुरकुटे यांच्याकडून संस्थेने आजवर केलेल्या सामाजिक उपक्रमांची व संस्थेच्या वाटचालीची माहिती घेतली. अनाथ महिलांना दरमहा ५०० रु. पेन्शन, सिंधूताई सपकाळ यांच्या संस्थेला दर वर्षी केली जाणारी मदत, जनतेच्या सेवेसाठी रुग्णवाहिका आदी संस्थेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. तसेच, संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. पतसंस्थेच्या वतीने अण्णा हजारे यांचा सन्मान संस्थापक-अध्यक्ष डॉ. दिलीप मुरकुटे यांनी केला. त्या वेळी संस्थेचे चेअरमन श्रीकांत तापकीर, संचालक योगेश काळोखे, राजश्री मुरकुटे, नामदेव भेगडे, सागर भसे, शशिकांत दर्शने, बेळगावकर दीपलक्ष्मी व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. तज्ज्ञ संचालक शशिकांत दर्शने यांनी आभार मानले.