शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या दारूबंदी लढ्याला अण्णा हजारेंचे पाठबळ

By admin | Updated: February 2, 2016 01:12 IST

निघोज या गावातील महिलांना केवळ मतदानात पारडे जड न राहिल्याने दारूबंदी करणे साधले नसले तरीही त्यांनी आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे धाव घेतली आहे.

टाकळी हाजी : निघोज या गावातील महिलांना केवळ मतदानात पारडे जड न राहिल्याने दारूबंदी करणे साधले नसले तरीही त्यांनी आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे धाव घेतली आहे. अण्णांनीही या लढ्याला पूर्ण पाठबळ देण्याचे जाहीर केले आहे. दारूबंदीचा निर्धार केलेल्या निघोजमधील (ता. पारनेर) महिलांच्या शिष्टमंडळाने अण्णा हजारे यांची भेट घेतली. निघोज गावातील दारूबंदीविरोधातील निवडणूक प्रक्रिया रद्द होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार असल्याची सूचना करणार आहोत. निघोजच्या ग्रामस्थांनी व महिलांनी दारूबंदीसाठी जो लढा दिला आहे तो निर्णायक होण्यासाठी आपले पूर्ण पाठबळ या आंदोलनाला असल्याचे आश्वासन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिले. ते म्हणाले, ‘‘या देशात लोकशाही चळचळ रुजविण्यासाठी नेत्यांनी बलिदान दिले आहे, मात्र दारू धंद्यांना उत्तेजन देण्यासाठी हेच लाचखोर अधिकारी लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करत आहेत. दारूबंदी चळवळीत आपण गेली अनेक वर्षे सक्रिय आहोत; मात्र असा काही प्रकार झालेला नाही. मात्र निघोजच्या महिलांचे आंदोलन राज्यभर गाजले याची भीती सरकारला आहे म्हणूनच या दारूबंदी आंदोलनामुळे दारूपासून मिळणारे उत्पन्न घटू नये यासाठीच दारूबंदी चळवळ मोडीत कशी निघेल यासाठी उभ्या बाटलीसाठी प्रयत्न केले आहेत. मात्र यामध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी आपण प्रयत्नशील रहाणार आहोत. असे भ्रष्टाचारी अधिकारी घरी गेलेच पाहिजे तसेच त्यांना शासनही झाले पाहिजे ही आपली भूमिका आहे. फेरनिवडणूक घ्या ही प्रमुख मागणी राहणार असून, निघोजच्या महिलांचा लढा निर्णायक होण्यासाठी आपणही आंदोलनात उतरून सर्वतोपरी पाठबळ मिळण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. (वार्ताहर)